...आणि थेट गाडीसमोर आलं 'भूत', पर्यटकांची काय झाली अवस्था पाहा VIDEO

...आणि थेट गाडीसमोर आलं 'भूत', पर्यटकांची काय झाली अवस्था पाहा VIDEO

या सावलीला आपल्या कॅमेऱ्या कैद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 18 सप्टेंबर : भूताच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. काही नुसत्या कथा असतात तर काही जण आपल्याला आलेल्या अनुभव ऐकवत असतात. पण खरंच असं भूत आपल्यासमोर येऊन उभ राहिलं तर आपली बोबडी वळेल. या भूताची भीती कायमच सूप्तपणे आपल्या मनात असते. काही दिवसांपूर्वी पार्कमध्ये मशीन्स आपोआप हलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. भूत आहे की नाही यावर अनेक विवाद असताना आता धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

पर्यटक रस्त्यावरून जात असताना दोन सावल्या त्यांना गाडीसमोरून जात असताना दिसल्या आणि त्यांची बोबडीच वळली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना अचानक गाडीसमोरून दोन सावल्या गेल्याचं जाणवलं आणि पर्यटकांचा गोंधळ उडाला. गाडी चालवत असताना शूटिंग सुरू असल्यामुळे हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

हे वाचा-आता हद्दच झाली! Tiktok फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीच्या मृत्यूचा बनवला फेक व्हिडीओ

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया इथल्या पर्यटकांच्या मते हा व्हिडीओ पाहून सगळेच जण हैराण झाले आहेत. गेटि्सबर्गमधून एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये दोन भूतं दिसल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एक कुटुंब त्यांच्या कारमधून सिव्हील वॉर साइटजवळून जात असताना त्यांना दोन सावल्या दिसल्या. ही माणसं नव्हती असाही या कुटुंबियांचा दावा आहे.

या सावलीला आपल्या कॅमेऱ्या कैद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आहे. या संपूर्ण प्रकार काय आहे यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत नीट पाहिलं तर दोन सावल्या आपल्याला दिसतील. गेटिसबर्गचा इतिहास आणि तिथली रहस्य जाणून घेण्यासाठी अनेक पर्यटक तिथे येत असतात या व्हिडीओमध्ये सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 18, 2020, 11:35 AM IST

ताज्या बातम्या