मुंबई, 27 सप्टेंबर : अजूनही जळगावातील रस्त्यावर दिसलेल्या त्या भुतांची (Jalgaon ghost video) चर्चा सर्वत्र होते आहे. जळगावातील भुतांचा व्हिडीओ (Ghost video) व्हायरल (Ghost viral video) करणाऱ्या तरुणांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान आता सोशल मीडियावर भुताचा एक मजेशीर व्हिडीओ (Ghost funny video) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात चक्क माणसाने भुताचा डाव उलटवून लावला आहे (Real ghost video).
भूत असतात की नाही माहिती नाही. काही जणांना भूत आहे असा विश्वास आहे, तर काही जण यावर बिलकुल विश्वास ठेवत नाहीत. पण सोशल मीडियावर भुतांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही खरे असल्याचा दावा केला जातो, काही फिल्ममधील असतात तर काही प्रँक म्हणून केलेले असतात. असाच हा एक व्हिडीओ आहे (Ghost prank video).
View this post on Instagram
भुताने माणसांशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला पण तो भुतालाच भारी पडला आहे. भुताचा डाव त्याच्यावरच उलटा पडला आहे.
हे वाचा - भूत भूत म्हणून शीर नसलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल करणे 3 तरुणांना पडले भारी, आता...
व्हिडीओत पाहू शकता एका बिल्डिंगमध्ये लिफ्टबाहेर पांढऱ्या कपड्यात केस मोकळे सोडलेली एक महिला उभी आहे. तिथून जितके लोक येतात तितके सर्वजण त्या महिलेला पाहताच घाबरतात. महिलेला पाहून त्यांना घाम फुटतो. भूत भूत म्हणत ते ओरडता तिथून पळ काढतात. सुरुवातीला दोन महिला येतात. त्यापैकी दोन्ही दोन दिशेने पळून जातात.
त्यानंतर तिसरा पुरुष येतो. तोसुद्धा सुरुवातीला दचकतो आणि आपल्या छातीवर हात ठेवतो. पण तो तिथून पळत नाही तर त्या महिलेकडे पाहत पाहत पुढे चालतो. त्याला काहीतरी गडबड असल्यासारखं वाटतं. त्याला संशयही येतो. तो पुढे जाऊन पुन्हा मागे येतो आणि भूत असलेल्या त्या महिलेला किक मारतो. ती महिला धाडकन जमिनीवर कोसळते आणि तिची पोलखोल होते. तिचा भुताचा खेळ खल्लास होतो.
हे वाचा - Horror video : 'ते' भूत की...? Gym मधील हे दृश्य पाहून दरदरून फुटेल घाम
हा एक प्रँक व्हिडीओ आहे, हे आता तुम्हालाही समजलं असेल. त्यामुळे हा व्हिडीओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला जात होता. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला भूत पाहून तुम्हालाही थोडी भीती वाटली असेल. पण व्हिडीओचा शेवट पाहून हसूही बिलकुल आवरलं नसेल. siraaaposts इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Shocking video viral, Viral, Viral videos