मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: दररोज 2 KM चालून मालकाचा डबा पोहोच करतो श्वान; निष्ठा पाहून वाटेल कौतुक

VIDEO: दररोज 2 KM चालून मालकाचा डबा पोहोच करतो श्वान; निष्ठा पाहून वाटेल कौतुक

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, शेरू नावाचा हा कुत्रा दररोज दोन किलोमीटर चालत त्याच्या वडिलांसाठी (मालक) ऑफिसमध्ये जेवण घेऊन जातो.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, शेरू नावाचा हा कुत्रा दररोज दोन किलोमीटर चालत त्याच्या वडिलांसाठी (मालक) ऑफिसमध्ये जेवण घेऊन जातो.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, शेरू नावाचा हा कुत्रा दररोज दोन किलोमीटर चालत त्याच्या वडिलांसाठी (मालक) ऑफिसमध्ये जेवण घेऊन जातो.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 30 मे : माणूस आणि कुत्रा यांचं नातं खूप खास आहे. मात्र कुत्रा त्याच्या मालकावर जेवढं प्रेम करतो, त्याच्याशी जेवढा एकनिष्ठ असतो, तेवढा माणूस खरंतर कुत्र्यासाठी नसतो. तुमच्या घरातही पाळीव कुत्रा असेल तर याचा पुरावा देण्याची गरज नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत आहे, जो हेच सिद्ध करतो. व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्याच्या कडेला तोंडात जेवणाचा डबा घेऊन चाललेला दिसत आहे (German Shepherd dog deliver tiffin to owner). इवल्याशा पक्ष्याने संपूर्ण पिझ्झा चोरून घेतली आकाशात भरारी? VIDEO पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल मनोरंजनाच्या बातम्यांशी संबंधित न्यूज वेबसाइट Pinkvilla ने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो लोकांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये एक जर्मन शेफर्ड कुत्रा तोंडात जेवणाचा डबा घेऊन चाललेला दिसत आहे (Dog Carrying Tiffin in Mouth). व्हिडिओनुसार तो त्याच्या मालकाची सेवा करत आहे. श्वान ज्या निष्ठेसोबत आणि प्रामाणिकपणे आपल्या मालकांसाठी नेहमीच हजर असतात, हे प्रशंसनीय आहे.
View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

व्हिडिओमध्ये एक जर्मन शेफर्ड कुत्रा तोंडात टिफिन धरून रस्त्याच्या कडेला चालत आहे. व्हिडिओची पार्श्वभूमी पाहून हा व्हिडिओ डोंगराळ भागातील असल्याचं दिसतं. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, शेरू नावाचा हा कुत्रा दररोज दोन किलोमीटर चालत त्याच्या वडिलांसाठी (मालक) ऑफिसमध्ये जेवण घेऊन जातो. जेव्हा त्याला एखादी गाडी जवळ येताना दिसते तेव्हा तो रस्त्याच्या बाजूला सरकतो आणि कडेने चालायला लागतो. व्हिडिओचं क्रेडिट timssyvats या इंस्टाग्राम अकाउंटला देण्यात आलं आहे. श्वानासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात; कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणाने घेतली पाण्यात उडी अन्.., पाहा VIDEO व्हिडिओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. प्रत्येकजण कुत्र्याचं कौतुक करत आहे आणि त्याला गोंडस म्हणत आहे. एका महिलेनं म्हटलं की, हा व्हिडिओ पाहून तिला अश्रू आवरता येत नाहीयेत. महिलेने लिहिलं की कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे. रस्त्यावरून एकट्याने चालायला लावून निष्पाप प्राण्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या कुटुंबावर एका महिलेनं राग व्यक्त केला आहे. एका व्यक्तीने असंही लिहिलं की हा प्राण्यांवर अत्याचार आहे.
First published:

Tags: Dog, Video Viral On Social Media

पुढील बातम्या