मुंबई 06 डिसेंबर : आपण आपल्या रोजच्या वापरात असे काही शब्द बऱ्याचदा वापरतो, ज्याचा नेमका अर्थ आपल्याला माहित नसतो. पण सगळेच ज्यात्या परिस्थीतीनुसार ते वापरतात. अशाच शब्दांपैकी एक आहे OK. हा शब्द तर आपण दिवसातून २० ते १०० वेळा वापरत असू, तसेच हा शब्द प्रत्येक व्यक्ती वापरतो.
एखाद्याशी गप्पा मारता, फोनवर बोलताना, एखाद्याशी समोरासमोर संभाषण करताना आपण OK शब्द वापरतो. जो आपण बऱ्याचदा आपली संमती दर्शवण्यासाठी वापरतो. त्याचा नेमका अर्थ आणि फुल फॉर्म फार कमी लोकांना ठावूक असेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की या दोन अक्षरी शब्दात इतके विशेष काय आहे?
हे ही वाचा : तुम्हाला किती वाटलं तरी तुम्ही हे बिस्किट खाऊच शकणार नाही, कारण...
जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे माहित नसतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. जी तुमचा जर्नल नॉलेज वाढवसाठी मदत करेल.
मिळालेल्या माहितीनुसार, 'All Correct'साठी OK हा शब्द वापरला जातो. पण 'All Correct' हा शब्द बदलून "Oll Korrect" केले आहे. त्यामुळेच त्याचा फुल फॉर्म AC असला तरी या शब्दाऐवजी "Oll Korrect" म्हणून OK वापरला जात आहे.
स्मिथसोनियन मासिकातील एक लेख बोस्टन मॉर्निंग पोस्टमध्ये 1839 साली प्रकाशित झाला होता. या लेखानुसार, OK हा शब्द 19व्या शतकाच्या सुरुवातीला ऐकायला मिळाला. त्या काळात इंग्रजी शब्दांना फॅशनेबल बनवण्याचा ट्रेंड सुरु होता.
म्हणजे शब्दांना शॉर्टकरुन बोललं जात होतं. हेच कारण आहे की त्यावेळी काही शब्दांचे स्पेलिंग चुकीचे होते, जे त्यांच्या मूळ शब्दांपासून बदलले होते. OK हा शब्द याच ट्रेंडमुळे समोर आला.
डॉ. एलेन वॉकर असा दावा करतात की हा शब्द "Oll Korrect" वरून आला आहे. हा लेख १८३९ साली बोस्टन मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित झाला होता.
याशिवाय OK बद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते आहेत. हफपोस्टच्या एका अहवालात असे म्हटले आहे की अनेक लोकांच्या मते, OK हा मूळ अमेरिकन भारतीय जमाती Choctaw च्या okeh या शब्दापासून आला आहे. त्याच वेळी, बऱ्याच लोकांनी असा युक्तिवाद देखील केला आहे की, हा शब्द आफ्रिकेच्या वोलोफ भाषेतून आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Social media, Top trending, Viral, Viral news