Home /News /viral /

Gay Couple Marriage: दोन पुरुषांनी थाटामाटात केलं एकमेकांशी लग्न! अनोख्या विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल

Gay Couple Marriage: दोन पुरुषांनी थाटामाटात केलं एकमेकांशी लग्न! अनोख्या विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल

Gay Couple Marriage: कोलकात्यात दोन पुरुषांनी केलं एकमेकांशी लग्न! खास विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Gay Couple Marriage: कोलकात्यात दोन पुरुषांनी केलं एकमेकांशी लग्न! खास विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Gay Couple Marriage in Kolkata: कोलकात्यामध्ये अभिषेक रे आणि चैतन्य शर्मा या दोन पुरूषांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  मुंबई, 5 जुलै: प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, असं म्हणतात. याची प्रचिती आपल्याला अनेकदा येते. अलीकडच्या मॉडर्न जमान्यात तर रोज असं काही आपल्या कानावर पडतं की ते ऐकून आपला स्वत:च्याच कानावर विश्वास बसत नाही. आता हेच बघा ना काहीच दिवसांपूर्वी एका तरूणीनं स्वत:शीच लग्न केलं होतं. या घटनेला जेमतेम महिना होतोय ना होतोय तोच आता कोलकात्यातील दोन पुरुषांचा खास विवाह (Gay Couple Marriage in Kolkata) चर्चेत आलाय. अभिषेक रे (Abishek Ray) आणि चैतन्य शर्मा (Chaitanya Sharma) या दोन पुरूषांचा नुकताच विवाह झाला. हो, हे दोघं विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photos on Social Media) होत आहेत. लग्न झालेल्या दोन पुरुषांपैकी अभिषेक रे हा कोलकातामध्ये डिझायनर म्हणून काम करतो. त्याने आपला खास मित्र चैतन्य शर्मासोबत लग्न केलं. विशेष म्हणजे हे सगळं लपूनछपून वगैरे झालं नाही बरं का! तर कोलकात्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा विवाह सोहळा अगदी थाटात पार पडला. त्यांच्या या लग्नात संगीत सोहळ्यापासून ते अगदी हळद, मेहंदीपर्यंतचे सर्व विधी पूर्ण करण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांचीही कुटुंब तिथं उपस्थित होती आणि फक्त उपस्थित नव्हती तर त्यांनी आनंदाने या नवविवाहीत जोडप्याला आशीर्वादही दिला. हेही वाचा- PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेची नवी यादी जाहीर, तुमचं नाव आहे की नाही? असं तपासा अभिषेक आणि चैतन्य या गे कपलच्या हळदी आणि लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये अभिषेकने पारंपारिक बंगाली धोती आणि कुर्ता घातला होता, तर चैतन्यने शेरवानी घातली होती. या अनोख्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. चैतन्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. लोकांनीही या दोघांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सोशल मीडियावर लोक या जोडप्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. लग्न करून हे दोघं किती आनंदी आहेत, हे लग्नसोहळ्यातील त्यांच्या फोटोवरून दिसत आहे. हेही वाचा- Shocking! बहीण-भावाने एकमेकांशी केलं लग्न; जन्माला आलं विचित्र मूल, काही तासांतच मृत्यू
  View this post on Instagram

  A post shared by Rishi Roy (@otterbot)

  हा भारतील पहिला समलिंगी विवाह आहे, असंही नाही. यापूर्वी भारतातील पहिला समलिंगी विवाह 2017 मध्ये झाला होता. त्यानंतर गतवर्षी डिसेंबरमध्ये याची पुनरावृत्ती झाली होती. यावेळी हैदराबादमध्ये एका समलिंगी जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग असं या जोडप्याचं नाव होतं. त्यांनी हैद्राबादमधील एका रिसॉर्टमध्ये लग्न केलं होतं. आता चैतन्य आणि अभिषेक यांनीही कोलकात्यामध्ये विवाहबंधनात अडकले आहेत.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: Marriage, Photo viral, Social media viral, Viral

  पुढील बातम्या