मुंबई, 02 डिसेंबर : सोशल मीडियावर आपल्या डान्समुळे चर्चेत असलेली डान्सर गौतमी पाटील. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात गौतमी पाटील हे नाव प्रसिद्ध आहे. तिच्या डान्सचे कार्यक्रम पाहण्यासाठी गावागावात तूफान गर्दी होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना झालेली गर्दी आपण पाहिली आहे. गर्दीत झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात झालेल्या वृद्धाच्या मृत्यूनंतर गौतमी पाटील प्रकरण चांगलाच तापलं. मात्र तरीही गौतमी पाटीलचे कार्यक्रम आणि तिच्या फॅन्सची संख्या काही कमी झालेली नाही. गौतमीच्या अश्लील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला मात्र आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गौतमीचा रौद्र अवतार पाहायला मिळत आहे.
कार्यक्रमादरम्यान छेड काढणाऱ्याला गौतमीनं चांगलाच चोप दिला आहे. या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाची साडी नेसलेली मुलगी त्या मुलाला बेदम चोप देताना दिसत आहे. राज्यातील पाथर्डी गावातील कार्यक्रमाचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत. हा व्हिडीओ 3 महिने जुना असल्याचं कळत आहे. मात्र मागच्या 2 दिवसांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्या तरुणाला मारत असलेली मुलगी ही गौतमी पाटीलच असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र संपूर्ण व्हिडीओमध्ये मारणाऱ्या त्या मुलीचा चेहरा दिसत नाहीये.
गौतमी पाटील? pic.twitter.com/aGYgTTexkF
— Ravindra A Deshmukh (@Rdeshmukh11) December 31, 2022
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मारणारी ती मुलगी गौतमी पाटील असल्याचं म्हटलं गेलं आहे मात्र प्रत्यक्षात ती गौतमी नसल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. पण व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलीनं हिरव्या रंगाची वेगळ्या प्रकारची साडी नेसली आहे. मागच्या काही महिन्यात झालेल्या वादानंतर गौतमीनं मी अश्लील काही करत नाही असं सांगितलं आहे. तिच्या पेहरावातही अनेक बदल पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे त्या मुलीचा चेहराही व्यवस्थित दिसत नाहीये. त्यामुळे तरुणाला मारणारी ती मुलगी गौतमी पाटील आहे असं म्हणता येत नाहीये.
त्याचप्रमाणे व्हिडीओमध्ये पुढे कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्या कलाकारांना पोलीस बाहेर आणि कार्यकर्ते बाहेर काढताना दिसत आहेत. त्यात कार्यक्रमातील सगळ्या साड्या नेसलेल्या मुलगी बाहेर जाताना दिसत आहेत. त्यातील शेवटची गुलाबी साडी नेसलेली मुलगी ही गौतमी पाटील असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. आता छेड काढणाऱ्या तरुणाला मारणारी ती मुलगी गौतमी पाटीलच आहे का? हे समोर आलेलं नाही. पण व्हिडीओमध्ये असलेल्या फरकावरून आपल्याला काही गोष्टी लक्षात येऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautami Patil, Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral