• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ...अन् पुराच्या पाण्यात वाहिले असंख्य गॅस सिलेंडर, रौद्र रूप दाखवणारा VIDEO VIRAL

...अन् पुराच्या पाण्यात वाहिले असंख्य गॅस सिलेंडर, रौद्र रूप दाखवणारा VIDEO VIRAL

पुराच्या पाण्यानं माजवलेल्या हाहाकाराचा आणखी एक व्हिडिओ (Flood Video) नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अनेक गॅस सिलेंडर (Gas Cylinders) वाहत असल्याचं पाहायला मिळतं.

 • Share this:
  भोपाळ 07 ऑगस्ट : देशात मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे. यामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. अशा अनेक घटनांचे हादरवणारे व्हिडिओदेखील (Shocking Videos) समोर आले आहेत. अशात आता पुराच्या पाण्यानं माजवलेल्या हाहाकाराचा आणखी एक व्हिडिओ (Flood Video) नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यामध्ये अनेक गॅस सिलेंडर (Gas Cylinders) वाहत असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) आहे. स्विमिंग पूलखाली NASA ने वसवलं दुसरं जग, पाण्याच्या आत घर, रस्ते आणि गाड्या! मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुनाच्या नॅशनल फर्टिलायझर प्लांटमध्ये पाणी शिरल्यानं ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की मोठ्या संख्येनं लोडेड सिलेंडर पाण्यात वाहत आहेत. हे धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुनामधील नॅशनल फर्टिलायझर प्लांटमध्ये पावसाचं पाणी शिरलं. यानंतर या पाण्यात अनेक सिलेंडर वाहून गेले. VIDEO - व्हिलचेअरसह रेल्वे ट्रॅकवर पडली अपंग व्यक्ती; धडधड करत आली ट्रेन आणि... नॅशनल फर्टिलायझर प्लांटच्या मागील भागात हे पाणी शिरलं. यानंतर एकापाठोपाठ एक असे सर्व सिलेंडर या पाण्यात वाहू लागले. गुना जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. याच कारणामुळे आलेल्या पुरात हे सिलेंडर वाहून गेले. यानंतर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पुराचं हे भयानक रूप पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: