कधी मांजरीला बोलताना पाहिलंय? पाहा हा धम्माल VIRAL VIDEO

कधी मांजरीला बोलताना पाहिलंय? पाहा हा धम्माल VIRAL VIDEO

मांजरीचा हा भन्नाट व्हिडीओ अजिबात मिस करू नका.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 डिसेंबर : सोशल मीडियावर प्राण्यांचे विविध मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक गॅम्बिनो नावाची एक मांजर चर्चेत आली आहे. या मांजरीची खास गोष्ट अशी आहे की तिची 'म्याव' बोलण्याची त्याची शैली खूप वेगळी आहे. या मांजरीवर बनवलेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे कारण या व्हिडिओमध्ये मांजर "बरं, हाय" म्हणताना दिसत आहे. मांजरीच्या मालकाने चार दिवसांपूर्वी टिक-टॉक आणि इन्स्टाग्रामवर मांजरीचा व्हिडीओ टाकला होता. त्यानंतर सोशल मीडियावर हजारो चाहते या मांजरीच्या प्रेमात पडले आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ही गॅम्बिनो मांजर दुसर्‍या मांजरीपासून पळून जाऊन एका फ्रिजच्या मागे लपताना दिसत आहे. या मांजरीचा मालक तिचा व्हिडीओ शुट करताना तिच्या मागे पळत असताना या मांजरीनं कॅमेराकडे बघून ‘वेल हाय’, असे म्हटल्याचे दिसत आहे.

वाचा-महिला शिक्षिकेने 15 वर्षाच्या विद्यार्थ्याला घेतलं दत्तक, ठेवले शारीरिक संबंध

वाचा-टी-20 वर्ड कपसाठी टीम इंडियाचे 10 खेळाडू निश्चित! फक्त एका खेळाडूची जागा बाकी

त्यामुळं या मांजरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर ही गॅम्बिनो मांजर सेलिब्रिटींच्या गळ्यातील ताईत झाली आहे.

वाचा-बंदी असलेल्या Porn साइट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा, अॅक्सेसचे प्रमाण वाढले

आतापर्यंत टीक-टॉकवर सुमारे 14 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचवेळी 6 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामावर पाहिला आहे. तसेच, व्हिडिओवर बर्‍याच कमेंटही आल्या आहेत. फॉक्स न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार 2014मध्ये या मांजरीला दत्तक घेण्यात आले होते. तेव्हापासून ही मांजर सोशल मीडियावर सर्वांची आवडती झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 03:45 PM IST

ताज्या बातम्या