मुंबई, 22 मार्च : सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडिओ वेगात व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही खूप हसाल यात शंका नाही. असं आहे तरी काय यात? (Funny English Learning Video)
या व्हिडिओत एका पंजाबी मुलाला एक व्यक्ती इंग्रजी शिकवतो आहे. सर्वात आधी या व्यक्तीनं मुलाला अक्षरं वाचायला सांगितली. मग पूर्ण ओळ म्हणायला सांगितली. मग मुलानं खूपच निरागसपणे एकदमच हैराण करणारं उत्तर दिलं. (Funny Video Kid Learning English)
आयपीएस ऑफिसर अरुण बोथरा यानं हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी उचलून धरला आहे. व्हिडिओत आपण पाहू शकतो, की मुलाच्या पॅन्टवर चॅम्पियन असं लिहिलेलं होतं.
हेही वाचा राक्षसी मुळा! महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं केलेला चमत्कार पहायला होते आहे गर्दी
एक-एक अक्षर वाचल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती त्याला पूर्ण ओळ म्हणायला सांगते म्हणतो, 'यह बना पजामा.' (Punjabi Kid Learning English)
Teaching English to a #Punjabi kid 😈 pic.twitter.com/yWhRxftFEr
— Arun Bothra (@arunbothra) March 13, 2021
आयपीएस ऑफिसर अरुण बोथरा यांनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, की जेव्हा तुम्ही पंजाबी मुलाला इंग्रजी शिकवता.
हेही वाचा चुलबुल पांडे जेव्हा भाजी विकतो...; भाजीवाल्या पांडेजीचा हटके VIDEO व्हायरल
हा व्हिडिओ त्यांनी 13 मार्चला शेअर केला.
Such a cute kiddo ... I will give out and out to him and zero to dad. 8 letter word to a 3 years old kid is crime !!
— Mysterious Me 🇮🇳 (@roykajal) March 13, 2021
याचे आजवर 18 हजारहून जास्त व्ह्यूज सोबतच 2 हजारहून जास्त लाईक्स आणि 300 हून जास्त रिट्वीट्स झाले आहेत. (Twitter video kid learns English)
I thought Shampane type bolega kuch, I was so wrong 😅😅😅😅
— Sumit Dhiman (@_sumitdhiman) March 13, 2021
लोकांना हा व्हिडिओ मजेदारपणामुळं भावतो आहे. लोकांनी कमेंट्समध्येही एकाहून एक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Twitter, Viral video.