मराठी बातम्या /बातम्या /Viral /असं स्वागत कुणी करतं होय? हसून हसून दुखू लागलं पोट, पाहा VIDEO

असं स्वागत कुणी करतं होय? हसून हसून दुखू लागलं पोट, पाहा VIDEO

एका समारंभात यजमानानं जमलेल्या (Funny video of flower shower on guest goes viral) पाहुण्यांचं असं काही स्वागत केलं की सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली.

एका समारंभात यजमानानं जमलेल्या (Funny video of flower shower on guest goes viral) पाहुण्यांचं असं काही स्वागत केलं की सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली.

एका समारंभात यजमानानं जमलेल्या (Funny video of flower shower on guest goes viral) पाहुण्यांचं असं काही स्वागत केलं की सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली.

एका समारंभात यजमानानं जमलेल्या (Funny video of flower shower on guest goes viral) पाहुण्यांचं असं काही स्वागत केलं की सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली. एका लग्नसमारंभासाठी जमलेल्या पाहुणेमंडळींना सुरुवातीला नेमका काय प्रकार (Weird style of welcome) चाललाय, तेच समजत नव्हतं. मात्र जेव्हा त्यांना यजमान करत असलेली गंमत (Funny Video) लक्षात आली, तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अनोख्या पद्धतीनं स्वागत

आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांवर फुलं उधळून त्यांचं स्वागत करणं, हा तसा नेहमीचा आणि रुळलेला प्रकार. अनेकजण फुलं टाकून किंवा अत्तर शिंपडून पाहुण्यांचं स्वागत करतात. पाहुण्यांना सन्मानाची आणि आदराची वागणूक देणं आणि त्यांचा मूड फ्रेश करणं हे प्रत्येक यजमानाचं कर्तव्य असल्याचं मानलं जातं. मात्र व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ज्या प्रकारे पाहुण्यांचं स्वागत करते, तो प्रकार फारच मजेशीर आहे.

कंबरेला बांधली पिशवी

व्हिडिओत दिसणारी व्यक्ती कंबरेला एक पिशवी बांधून पाहुण्यांच्या मधून विचित्र पद्धतीनं चालत पुढे पुढे जाताना दिसते. कंबरेल्या बांधलेल्या पिशवीत त्याने फुलांच्या पाकळ्या ठेवल्या आहेत. त्यातील थोड्या थोड्या पाकळ्या काढून ती उपस्थित पाहुण्यांच्या दिशेनं भिरकावत आहे. आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या पाहुण्यांच्या अंगावर त्या पाकळ्या पडत आहेत. मात्र अंगावर पाकळ्या टाकण्याची जी काही स्टाईल या व्यक्तीनं निवडली आहे, ती पाहून प्रत्येकाला हसू फुटतं.

हे वाचा- चीन झपाट्याने म्हातारा होतोय! मुलांना जन्म देण्यास का घाबरतायेत तरुण?

व्हिडिओला जोरदार प्रतिसाद

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत असून त्याला युजर्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून हसून हसून पोटात दुखायला लागलं, अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. तर हा व्हिडिओ फारच फनी असल्याचं दुसऱ्यानं म्हटलं आहे. पाहुणचार करण्याची ही अनोखी स्टाईल सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.

First published:
top videos

    Tags: Funny video, Video viral