• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • स्टेजवर येऊन पाया पडू लागले नवरदेवाचे मित्र; पाहा रागावलेल्या नवरीबाईनं काय केलं, VIDEO

स्टेजवर येऊन पाया पडू लागले नवरदेवाचे मित्र; पाहा रागावलेल्या नवरीबाईनं काय केलं, VIDEO

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं की नवरदेव आपल्या नवरीबाईसोबत स्टेजवर उभा आहे. इतक्यात त्याला सरप्राईज देण्यासाठी त्याचे काही मित्र स्टेजवर येतात.

  • Share this:
    नवी दिल्ली 09 नोव्हेंबर : लग्नात नवरी आणि नवरदेवाचे (Bride and Groom) मित्र मस्करी करणार नाहीत, असं शक्य नाही. अनेकदा तर मित्र असं सरप्राईज (Surprise in Wedding) देतात, जे पाहून सगळेच हैराण होतात. नवरदेवाचे मित्र लग्नात मस्ती करताना दिसतात तर नवरीबाईच्या मैत्रिणी दाजीची मस्करी करण्यात व्यस्त असतात. याच कारणामुळे लग्नातील असे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर (Wedding Video Viral on Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केला चिमुकल्याचा प्रेरणादायी VIDEO, एकदा बघाच इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं की नवरदेव आपल्या नवरीबाईसोबत स्टेजवर उभा आहे. इतक्यात त्याला सरप्राईज देण्यासाठी त्याचे काही मित्र स्टेजवर येतात. मित्र स्टेजवर येताच नवरदेव हसू लागतो. त्यालाही समजतं की मित्र काहीतरी मजेशीर सरप्राईज देणार आहेत. फक्त नवरदेवच नाही तर नवरीही या सर्वांना स्टेजवर पाहून हैराण होते आणि विचार करू लागते की हे नेमकं काय करणार आहेत. इतक्यात एक गाणं सुरू होतं आणि सर्वजण हातात पुष्पगुच्छ घेऊन नाचत स्टेजवर येतात. नवरी आणि नवरदेवाजवळ येताच हे सर्व गुडघ्यावर बसले आणि बुके देऊ लागले.
    नवरदेवाच्या मित्रांचं हे कृत्य पाहून नवरी जोरात हसू लागली. यानंतर नवरदेवाच्या मित्रांनी आणखी एक सरप्राईज दिलं. नवरदेवाला बाजूला ठेवून हे सर्व नवरीच्या पाया पडू लागले. हे पाहून नवरीबाई रागावली आणि आपले दोन्ही हातात बांधून उभा राहिली. मात्र काही वेळातच नवरीबाई पुन्हा हसू लागली आणि सर्वांना उठून उभा राहण्यास सांगितलं. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. VIDEO : जमिनीच्या तुकड्यावरुन दोन गटांमध्ये खुनी संघर्ष; महिलांनाही मारहाण या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे. इन्स्टाग्रामवर कपल ऑफिशियल पेज नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, जो असं करेल अशा मित्राला टॅग करा. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, बहुतेकदा नवरदेवाचे मित्र आणि नवरीचे दीरच लग्नात जास्त उत्सुक असल्याचं दिसतं.
    Published by:Kiran Pharate
    First published: