मराठी बातम्या /बातम्या /Viral /काचेच्या पुलावरून चालताना उडाली भंबेरी, VIDEO पाहून येईल हसू

काचेच्या पुलावरून चालताना उडाली भंबेरी, VIDEO पाहून येईल हसू

काचेच्या पुलावरून चालताना त्याची अशी काही भंबेरी उडाली, की पाहणाऱ्यांना हसू आलं. ज्या गोष्टीला तो घाबरत होता, प्रत्यक्षात ते भलतंच निघालं.

काचेच्या पुलावरून चालताना त्याची अशी काही भंबेरी उडाली, की पाहणाऱ्यांना हसू आलं. ज्या गोष्टीला तो घाबरत होता, प्रत्यक्षात ते भलतंच निघालं.

काचेच्या पुलावरून चालताना त्याची अशी काही भंबेरी उडाली, की पाहणाऱ्यांना हसू आलं. ज्या गोष्टीला तो घाबरत होता, प्रत्यक्षात ते भलतंच निघालं.

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: काचेच्या पुलावरून (Bridge of glass) जाताना तो मोडून आपण खाली (Fell down) पडू, या भितीने (Fear) गाळण उडालेल्या व्यक्तीचा मजेशीर व्हिडिओ (Funny video goes viral) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांना पर्यटनाची हौस तर असते, मात्र भित्रा स्वभाव असेल, तर या ना त्या कारणाने जिवाची भीती वाटत असते. जगात अनेक देशांमध्ये काचेचे पूल उभारण्यात आले आहे. उंचावर उभारलेले हे पूल हवेतून चालल्याचा अनुभव मिळावा, या उद्देशानं बांधण्यात आलेले असतात. विशेषतः निसर्गरम्य ठिकाणी, पर्यटनस्थळी अशा पुलांची संख्या मोठी असल्याचं दिसून येतं. या पुलावरून चालण्याची मजा अनेकजण घेत असतात आणि पुलाचा वापर करून एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात. मात्र अनेकदा घाबरट लोकांना या पुलाची भिती वाटते आणि आपण खाली पडू की काय, अशी शंका त्यांना येत राहते. अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काच फुटण्याची भीती

व्हिडिओत दिसणारा माणूस हा काचेच्या पुलावरून पलिकडे जात असताना मध्येच थांबल्याचं दिसतं. तो पुलावर एका जागी खाली बसला आहे आणि काचेच्या पुलाशेजारी असणाऱ्या कठड्यावर आसरा शोधत असल्याचं दिसतं. तो ज्या ठिकाणी पाय ठेवतो, तिथली काच फुटल्याचं दिसतं आणि आपण आता उंचावरून खाली कोसळू आणि आपला जीव जाईल, अशी भीती त्या माणसाला वाटत राहते.

खुलासा झाल्यावर हसू

या व्यक्तीच्या पाठिमागून काही वेळाने आणखी एक व्यक्ती शांतपणे पुलावरून चालत येते आणि त्याला ओव्हरटेक करून पुढे जाते. त्यावेळी ती व्यक्ती जिथं जिथं पाय ठेवते, तिथंही काच फुटल्याचा इफेक्ट दिसतो. प्रत्यक्ष काच फुटत नसून व्यक्ती जिथं पाय ठेवतील, तिथं काच फुटल्याचा इफेक्ट हा मुद्दाम देण्यात आल्याचं समजतं आणि आपण उगाचच घाबरत होतो, याचा साक्षात्कार घाबरणाऱ्या व्यक्तीला होतो.

हे वाचा- अजबच! जो तो येतो याला मारतो; ताणतणावातून बाहेर काढणारी Human Punching Bag

व्हिडिओ होतोय व्हायरल

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाख 85 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून 10 हजारपेक्षा अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.

First published:
top videos

    Tags: Tour, Video viral