VIDEO: पत्नीच्या तोंडाला काळं फासायला गेला अन्...; पतीची फजिती पाहून खळखळून हसाल
VIDEO: पत्नीच्या तोंडाला काळं फासायला गेला अन्...; पतीची फजिती पाहून खळखळून हसाल
व्हिडिओमध्ये (Video) एक महिला सोफ्यावर झोपलेली दिसत आहे. तिच्या पतीनं आपल्या हातावर काळा रंग लावलेला आहे. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, की पती आपल्या पत्नीसोबत प्रँक करण्याचा प्रयत्न करत आहे.
नवी दिल्ली 18 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) तुम्हाला अनेक प्रँक व्हिडिओ (Prank Video) पाहायला मिळतात. असे मजेशीर व्हिडिओ (Funny Video) प्रचंड व्हायरलदेखील होतात. याच कारणामुळे आजकाल प्रँक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात अपलोड केले जातात. विशेषतः कपलचे प्रँक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भलतेच पसंतीस उतरतात. सध्या सोशल मीडियावर एक जोडप्याचा प्रँक व्हिडिओ व्हायरल (Couple Prank Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पतीला या गोष्टीचा अंदाजही नव्हता की तो जो प्रँक आपल्या पत्नीसोबत करण्याच्या विचारात आहे तो त्याच्यावरच उलटणार आहे.
स्वस्त साबण पडला महागात; अचानक पेट घेतल्यानं 4 वर्षीय मुलाची झाली भयंकर अवस्था
अनेक लोक असे असतात जे सतत कोणासोबत तरी प्रँक करण्याची संधीच शोधत असतात. सध्या व्हायरल होणारी ही व्हिडिओ क्लिपही अशीच आहे. व्हिडिओमध्ये एक महिला सोफ्यावर झोपलेली दिसत आहे. तिच्या पतीनं आपल्या हातावर काळा रंग लावलेला आहे. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं, की पती आपल्या पत्नीसोबत प्रँक करण्याचा प्रयत्न करत आहे. तो आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर काळा रंग फासून तिला त्रास देण्याचा विचार करत आहे. मात्र, पुढच्याच क्षणी हा प्रयत्न पतीवरच उलटल्याचं दिसतं.
हा व्यक्ती आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर काळं फासण्यासाठी हात पुढे करतो, इतक्यात त्याला शिंक येते. यानंतर पती विसरतो की त्याच्या हाताला काळा रंग आहे आणि तो आपला हात तोंडाला लावतो. आवाज ऐकून पत्नीही झोपेतून जागी होते. मात्र, इथे नेमकं काय घडलं हेच तिला कळत नाही.
नवरीबाई जोमात! मंडपातच मारला असा शॉट, क्लीन बोल्ड झाला नवरा; Video viral
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. प्रँकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत 1500 हून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत पतीचीच मस्करी केली आहे. एका यूजरनं कमेंट करत म्हटलं, की जसं कराल तसंच भराल. अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.