Home /News /viral /

प्रँक करत होता युवक; अनोळखी व्यक्तीनं मध्येच येऊन जे केलं त्यानं VIDEO मध्ये आला मजेशीर ट्विस्ट

प्रँक करत होता युवक; अनोळखी व्यक्तीनं मध्येच येऊन जे केलं त्यानं VIDEO मध्ये आला मजेशीर ट्विस्ट

प्रँक व्हिडिओमध्ये (Prank Video) एक व्यक्ती स्वतःची मस्करी करून लोकांना हसवण्याच्या बेतात आहे. मात्र, हा प्रँक त्याच्यावरच उलटतो.

    नवी दिल्ली 13 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) अनेक असे विनोदी व्हिडिओ (Funny Video) आहेत जे पाहून कोणीही पोट धरून हसेल. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एक व्यक्ती एलिवेटवरुन येणाऱ्या लोकांच्या अपोझिट उभा राहून त्यांच्यासोबत मस्करी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ही मस्करी त्याच्यावरच उलटल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल, की त्या व्यक्तीनं केलेली मस्करी त्यालाच महागात पडली आहे. प्रॉपर्टीवर डोळा ठेवून होता नातू; आजीने शिकवला चांगलाच धडा; VIDEO VIRAL एलिवेटरच्या उजव्या बाजूनं खाली जात असलेला व्यक्ती विचित्र पद्धतीनं आपलं खोटं हेअर विग (Hair Wig) काढतो. प्रँक व्हिडिओमध्ये तो स्वतःची मस्करी करून लोकांना हसवण्याच्या बेतात आहे. मात्र, यानंतर डाव्या बाजूनं वरती जाणारा व्यक्ती अगदी त्याच पद्धतीनं आपल्या डोक्यातील हेअर विग काढतो. हे पाहून प्रँक व्हिडिओ (Prank Video) बनवणारा व्यक्ती स्वतःच हैराण होतो. Hair Dye करताना एक छोटीशी चूक पडली महागात; सलूननंतर थेट गाठावं लागलं हॉस्पिटल ट्विटरवर हा व्हिडिओ (Twitter Video) @Laughs_4_All नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेकडो लोकांनी लाईक केला आहे. इतकंच नाही तर हा व्हायरल व्हिडिओ 16 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला दिलेल्या कॅप्शनमध्ये (Video Caption) सुपर ब्रो असं लिहिलं गेलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकानं कमेंट करत लिहिलं, की मीदेखील या प्रँक व्हिडिओमध्ये सहभागी होऊ शकलो असतो, तर किती बरं झालं असतं. कारण मीदेखील माझ्या केसांना खूप मिस करत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Video viral

    पुढील बातम्या