Home /News /viral /

लहान जीव समजून पंगा घेणं हत्तीला भोवलं; इवल्याशा पक्षाने गजराजची केली वाईट अवस्था, पाहा VIDEO

लहान जीव समजून पंगा घेणं हत्तीला भोवलं; इवल्याशा पक्षाने गजराजची केली वाईट अवस्था, पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये (Elephant and Bird Fight) तुम्ही पाहू शकता की एक पक्षी नदीच्या काठावर पाणी पीत आहे. दरम्यान, एक छोटा हत्ती तिथे मस्ती करण्याच्या मूडमध्ये येतो आणि पक्ष्याला त्रास देऊ लागतो

    नवी दिल्ली 27 मे : कर्म करा, परिणामाची चिंता करू नका, असं म्हटलं जातं. मात्र असंही म्हटलं जातं की एखाद्यासोबत कोणी वाईट केलं, तर त्याचं फळही त्याला आज ना उद्या कोणत्या ना कोणत्या रूपात मिळतंच. मात्र कधीकधी कर्माचं फळ अगदी काही क्षणातच मिळतं. या गोष्टी फक्त माणसांनाच लागू होत नाहीत तर प्राण्यांनाही लागू होतात. विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. यात एक लहान हत्ती एका पक्षाला त्रास देताना दिसतो. मात्र नंतर पक्षी त्याला अशी अद्दल घडवतो की यापुढे कोणालाही त्रास देताना हत्ती दहा वेळा विचार करेल. VIDEO - इवल्याशा उंदरावर तुटून पडला श्वानांचा कळप; शेवटपर्यंत एकट्याने लढा दिला अखेर... व्हिडिओमध्ये (Elephant and Bird Fight) तुम्ही पाहू शकता की एक पक्षी नदीच्या काठावर पाणी पीत आहे. दरम्यान, एक छोटा हत्ती तिथे मस्ती करण्याच्या मूडमध्ये येतो आणि पक्ष्याला त्रास देऊ लागतो. तो वारंवार आपल्या सोंडेत पाणी भरतो आणि या पक्षावर पाणी फेकू लागतो. त्यामुळे पक्षी अस्वस्थ होतो आणि काही सेकंदांनंतर चिडलेला पक्षी हत्तीला धडा शिकवताना दिसतो. पक्षी हत्तीच्या अंगावर बसून तसंच त्याच्या मागे धावून गजराजला अक्षरशः पळायला भाग पाडतो. हा व्हिडिओ ट्विटरवर आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'कोणालाही छोटं समजून त्याला त्रास देणं, म्हणजे मूर्खपणा आहे. कारण इवलासा पक्षीही हत्तीला नाचायला भाग पाडू शकतो.' बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 34 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बापरे बाप! वृद्ध व्यक्तीला सिंहाने जबड्यात धरून फरफटत नेलं; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य एका यूजरने लिहिलं, कधीही कोणालाही कमजोर समजू नका. दुसऱ्या यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हत्ती तर प्रेमाने पक्षाला अंघोळ घालत होता, पक्षाने याचा चुकीचा अर्थ घेतला. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Elephant, Funny video

    पुढील बातम्या