Home /News /viral /

नवरीबाई जोमात अन् नवरदेव कोमात; भरमंडपातील मस्तीचा मजेशीर Video Viral

नवरीबाई जोमात अन् नवरदेव कोमात; भरमंडपातील मस्तीचा मजेशीर Video Viral

सध्या इंटरनेटवर व्हायरल होणारा एक व्हिडिओ पाहून याचा अंदाज लावता येईल की मंडपात बसलेली नवरीबाई मस्तीच्या मूडमध्ये आहे. कॅमेऱ्याच्या समोरच ती बॉलिवूड अभिनेता गोविंदाचं गाणं म्हणू लागते.

  नवी दिल्ली 16 जुलै : लग्नसमारंभामध्ये (Marriage Function) नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) दोघंही भरपूर शांत बसलेले शक्यतो आपल्याला दिसतात. इतकंच नाही तर नवरीबाई बहुतेकदा डोक्यावर पदर घेऊन आणि खाली मान घालून बसलेली दिसते. मात्र, आजकाल ही परिस्थिती थोडी वेगळी झाली आहे. आजकाल बऱ्याचदा नवरदेव शांत बसलेला पाहायला मिळतो आणि नवरीच मस्ती करताना दिसते. लग्न मंडपात एन्ट्रीपासून ते सात फेरे घेईपर्यंत नवरीबाईच्या बऱ्याच करामती कॅमेऱ्यात कैद होतात. हे व्हिडिओ (Wedding Video) सोशल मीडियावर व्हायरलही (Viral on Social Media) होतात आणि विशेष म्हणजे ते लोकांच्या पसंतीसही उतरतात. एका दिवसावर लग्न अन् दारात वरातीऐवजी नवरीचा मृतदेह; झोपेतच तरुणीवर काळाचा घाला सध्या इंटरनेटवर व्हायरल होणारा एक व्हिडिओ पाहून याचा अंदाज लावता येईल की मंडपात बसलेली नवरीबाई मस्तीच्या  मूडमध्ये आहे. कॅमेऱ्याच्या समोरच ती बॉलिवूड अभिनेता गोविंदाचं गाणं म्हणू लागते. मंडपातच कॅमेरा पाहून नवरीबाई 'हद कर दी आपने...' गाण्यावर हावभाव देऊ लागते. या सगळ्या दरम्यान नवरदेव मात्र एकदम शांत बसलेला दिसतो. तो फक्त शांतपणे कॅमेऱ्याकडे पाहात असल्याचं पाहायला मिळतं.
  VIDEO: भिंतींतून येऊ लागले ओरडण्याचे आवाज; बचाव पथकाला नग्नावस्थेत आढळली महिला सोशल मीडियावर नवरी आणि नवरदेवाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. नवरदेव शांत बसल्याचा फायदा घेत नवरीनं भरपूर मस्ती केल्याचं दिसतं. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ निधी चौबेनं शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 20 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. नवरीच्या हावभावांनी अनेकांची मनं जिंकली आहेत. बऱ्याच जणांनी तिला एक्सप्रेशन क्वीनही म्हटलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video viral, Wedding video

  पुढील बातम्या