मराठी बातम्या /बातम्या /Viral /

डीजेचा आवाज येताच कुत्र्यानंही धरला ठेका; हा डान्स VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

डीजेचा आवाज येताच कुत्र्यानंही धरला ठेका; हा डान्स VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की घराबाहेर एक कुत्रा अगदी मजेशीर पद्घतीनं डान्स करताना दिसतो. मागून बॅकग्राउंडमध्ये म्यूझिकचा आवाज ऐकू येत आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : प्राण्यांवर प्रेम (Animal Love) करणारे लोक अनेकदा इंटरनेटवर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ (Photos and Videos of Animals) शेअर करत राहतात. आपण सर्वांनीच माकड, मांजर आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांना इकडून तिकडे उड्या मारताना नेहमीच पाहिलं असेल. ट्रेनिंगनंतर परफॉर्मन्स करणाऱ्या प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला डान्स करताना पाहिलंय का? बहुतेक लोकांचं उत्तर नाहीच असेल. कारण डान्स करण्यासाठी गाणं आणि म्यूझिकची समज असणंही गरजेचं आहे. सध्या एका कुत्र्याचा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Dance Video of Dog) होत आहे. यात हा कुत्रा जबरदस्त अंदाजात डान्स करताना दिसतो.

शी! थुंकी लावून तंदूरी रोटी; ढाब्याचा VIDEO समोर आल्यानंतर परिसरात खळबळ

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की घराबाहेर एक कुत्रा अगदी मजेशीर पद्घतीनं डान्स करताना दिसतो. मागून बॅकग्राउंडमध्ये म्यूझिकचा आवाज ऐकू येत आहे. कुत्रा दोन पायांवर उभा राहून मजेशीर पद्धतीनं डान्स करत आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की डॉगी आपला डान्स एन्जॉय करत आहे. यावेळी त्याचे रिअॅक्शन पाहण्यासारखे आहे. यावेळी एका दुसऱ्या कुत्र्याला पाहणंही अतिशय मजेशीर आहे. जणू डीजेची धून त्यालाही भरपूर आवडली आहे.

Shocking! ग्राहकानं जेवणाची तक्रार करताच भडकली वेट्रेस; रागात बंदूक ताणली अन्...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, कुत्र्याचा डान्स खरंच मजेशीर आहे. दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, मला हे एडिटेड वाटत आहे. आणखी एका यूजरनं लिहिलं, याची प्रत्येक स्टेप एकदम डिस्को डान्सरप्रमाणे आहे. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर Funny Videos/Viral Videos नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

First published:

Tags: Dance video, Dog, Funny video