• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: डान्स करतानाच युवकाच्या पाठीवर चढली तरुणी; पुढे जे केलं ते पाहून उपस्थितही शॉक

VIDEO: डान्स करतानाच युवकाच्या पाठीवर चढली तरुणी; पुढे जे केलं ते पाहून उपस्थितही शॉक

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एका कार्यक्रमातील डान्स व्हिडिओ व्हायरल (Dance Video Viral) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल हसत-खेळतं कार्यक्रमात प्रवेश करतं

 • Share this:
  नवी दिल्ली 11 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) कपल डान्सचे व्हिडिओ (Couple Dance Video) अनेकदा व्हायरल (Viral Video) होत राहतात. यात कपलची केमिस्ट्री, बॅलन्स आणि प्रेम पाहण्यासारखं असतं. मात्र, जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीत 100 टक्के परफेक्ट नसतो. असंच काहीसं डान्सच्या बाबतीतही होतं. तुम्हाला खूप चांगला डान्स येत असला तरीही अनेकदा तुमच्याकडून चुका होणं सहाजिकच आहे. सध्या एका कपलचा असाच मजेशीर डान्स व्हिडिओ (Funny Dance Video) व्हायरल झाला आहे. महिलेनं BF ला दिलं 17 पानी रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट लेटर; डेटवर जाण्याआधी अजब मागणी सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एका कार्यक्रमातील डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल हसत-खेळतं कार्यक्रमात प्रवेश करतं. दोघंही अगदी मजेत लोकांसमोर डान्स करत असतात. त्यांची केमिस्ट्री तिथे उपस्थित सर्वांनाच आवडते. मात्र, काही वेळातच डान्स करणारं हे कपल जास्तच उत्साही होतं आणि तरुणी डान्स करता करताच अचानक युवकाच्या पाठीवर चढते. पुढे जे काही घडतं ते अतिशय मजेशीर आहे.
  View this post on Instagram

  A post shared by hepgul5 (@hepgul5)

  दुकानात बसलेला मुलगा; इतक्यात छतावरुन कोसळला कोब्रा अन्...; धडकी भरवणारा VIDEO तरुणी पाठीवर चढल्यानंतर काही वेळ हा मुलगा स्वतःला बॅलन्स करतो. मात्र, तो युवती पाठीवर असतानाही मजेत डान्स करत राहतो. इतक्यात त्याचा बॅलन्स बिघडतो आणि दोघंही धाडकन खाली कोसळतात. हा व्हायरल डान्स व्हिडिओ आतापर्यंत 94 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. कपलची अवस्था पाहून अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: