VIDEO : मस्तीच्या धुंदीत कोल्ह्यानं सिंहाच्या शेपटीवर मारला पंजा आणि...

VIDEO : मस्तीच्या धुंदीत कोल्ह्यानं सिंहाच्या शेपटीवर मारला पंजा आणि...

वन विभाग अधिकारी (आयएएस)रमेश पांडे यांनी हा मजेशीर व्हिडीओ ट्वीट केला आहे.

  • Share this:

मुंबई, 02 मार्च : सोशल मीडियावर अनेक फनी व्हिडीओ किंवा प्रॅक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्या व्हिडीमधून आपलं मनोरंजन होत असतं. युझर्स अशा व्हिडीला तुफान पसंती देतात. जंगलात प्राण्यांमध्ये घडणाऱ्या मजा किंवा मस्तीचे व्हिडीओ मात्र फार दुर्मीळ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ वन विभाग अधिकारी (आयएएस)रमेश पांडे यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. डोक्यावर रणरणतं ऊन असल्यानं जंगलाचा राजा सिंह झाडाच्या सावलीमध्ये पहुडला होता. आपली शेपटी हलवत निवांत झोपलेल्या या सिंहाची मज्जा करण्याची हुक्की या कोल्ह्यासदृश प्राण्याला आली असवी आणि त्याने दबक्या पवालांनी येत सिंहाच्या हलत्या शेपटीवर पंजा मारला. या प्राण्याने केलेल्या कृत्याचा चांगलाच राग सिंहाला आला होता. पण सावलीत पहुडल्यानंतर पुन्हा उनात उठून जाण्याचे कष्ट घ्यावे की नाही असाही विचार करत असावा. या पंजा मारणाऱ्या प्राण्याच्या अंगावर रागानं धावून जाणार तोच या कोल्ह्यासारख्या दिसणाऱ्या प्राण्य़ानं पळ काढला. सिंह उठला तर आपली खैर नाही हे त्याचा लक्षात येताच तो तिथून पळत दुसऱ्या वाटेनं निघून गेला.

हे वाचा-नको रे बाबा Corona होईल ! भीतीपोटी हाताऐवजी पायाचा वापर, व्हिडीओ व्हायरल

एरवी सिंहाच्या जवळही एक प्राणी उभा राहू शकत नाही. मात्र शेपटीपर्यंत पोहोचण्याची हिंमत मात्र या प्राण्यानं दाखवली. या व्हिडीला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. हजारांच्या घरात लाईक्स आणि पाचशे कमेंट्स मिळाल्या आहेत. जंगलातील या मस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र धुमाकूळ घातलं आहे. सिंहासोबत पंगा घेतला असंही काही युझर्सनी म्हटलं आहे.

हे वाचा-जीवघेणा खेळ, tik tok करताना शूट झाला तरुणाच्या मृत्यूचा थरारक LIVE VIDEO

First published: March 2, 2020, 2:30 PM IST

ताज्या बातम्या