मी तुला का सलाम करू रे...,स्वातंत्र्य दिनी शहिदाच्या कुटुंबीयाचा आक्रोश, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

मी तुला का सलाम करू रे...,स्वातंत्र्य दिनी शहिदाच्या कुटुंबीयाचा आक्रोश, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

चार वर्षांपूर्वीच दृष्यंत पोलीस दलात भरती झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

  • Share this:

गडचिरोली, 15 ऑगस्ट : आज देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पण, दुसरीकडे गडचिरोलीमध्ये माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या दृष्यंत नंदेश्वर यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. चार वर्षांपूर्वीच दृष्यंत पोलीस दलात भरती झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

गडचिरोलीत शोकाकुल वातावरणात शहीद जवान दृष्यंत नंदेश्वर (वय 26) यांच्यावर पोलीस दलाकडून पोलीस मैदानावर अखेरचा निरोप देण्यात आला. शुक्रवारी माओवाद्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या दृश्यंत यांना वीरमरण आले होते. बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलीस दलाने मानवंदना दिली. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. राज्यमंत्री राजेंद्र येट्रावकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.

गडचिरोलीतील कोठी या गावात दुकानात खरेदीसाठी गेलेल्या जवानावर माओवाद्याच्या अॅक्शन टीमकडून गोळीबार केला. यात दृष्यंत नंदेश्वर शहीद झाला. तर दिनेश भोसले हा जवान जखमी झाला. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तर दृष्यंत नंदेश्वर यांचा मृतदेह रात्री उशीरा गडचिरोलीत पोहोचला त्यामुळे मानवंदना झाली नाही. मुसळधार पाऊस असल्याने हेलिकॉप्टर जावू शकले नाही. तसंच अतिसंवेदनशील भाग असल्याने  रस्त्याची तपासणी झाल्याशिवाय वाहनाने मृतदेह 200 किमी  गडचिरोलीत आणणे शक्य नव्हते. अखेर पाऊस कमी झाल्यावर हेलिकॉप्टर पाठवण्यात आले.

शहीद जवान दृष्यंत नंदेश्वर हे गडचिरोलीचो रहिवासी आहे. चार वर्षांपूर्वी पोलीस दलात भरती झाले होते. पोलीस दलात भरती झाल्यानंतर गडचिरोलीमध्येच सेवेसाठी दाखल झाले होते. पण, माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात दृष्यंत नंदेश्वर यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Published by: sachin Salve
First published: August 15, 2020, 1:00 PM IST

ताज्या बातम्या