मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बेडकांच्या लग्नात जेवली 1000 वऱ्हाडी मंडळी; पाहा कसं थाटामाटात झालं हे अनोखं लग्न

बेडकांच्या लग्नात जेवली 1000 वऱ्हाडी मंडळी; पाहा कसं थाटामाटात झालं हे अनोखं लग्न

एखाद्या सामान्य माणसाचं कदाचिक होणार नाही असं धुमधडाक्यात, अगदी विधीपूर्ण आणि हजारो लोकांच्या उपस्थिती दोन बेडकांचं (unique frog marriage) लग्न पार पडलं. हिंदू विवाह परंपरेनं हे थाटामाटातीस लग्न 11 सप्टेंबर रोजी झालं.

  • Published by:  News18 Desk
रायगड, 12 सप्टेंबर : एखाद्या सामान्य माणसाचं कदाचिक होणार नाही असं धुमधडाक्यात, अगदी विधीपूर्ण आणि हजारो लोकांच्या उपस्थिती दोन बेडकांचं (unique frog marriage) लग्न पार पडलं. हिंदू विवाह परंपरेनं हे थाटामाटातीस लग्न 11 सप्टेंबर रोजी झालं. या खास लग्नासाठी वधू आणि वराच्या बाजूचे 1000 हून अधिक लोक उपस्थित होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल कि हे लग्न म्हणजे जणू उत्सवच होते. लग्नात लोक नाचले, गायले आणि जेवणावरही ताव मारला. मंत्राच्या जपाने पंडितांनी विवाह सोहळ्याची सांगता केली. या अनोख्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. छत्तीसगडची राजधानी रायगडमध्ये हे अनोख लग्न पार पडलं. छत्तीसगडच्या ग्रामीण भागात अशी धारणा आहे की, जर दोन बेडकांचे लग्न लावले की भागात चांगला पाऊस पडतो. या विश्वासाखातर रायगड जिल्ह्यातील लैलुंगा ब्लॉकमधील बेस्किमुडा या छोट्याशा गावात शनिवारी नर बेडूक आणि मादी बेडकाचा विवाह पूर्ण रितीरिवाजानं झाला. हिंदू परंपरेत जसे एखाद्याचं लग्न होते, त्याच विधींसह हा विवाह सोहळा पूर्ण थाटामाटात पार पडला. या खास लग्नाच्या आमंत्रणासाठी लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. लग्नात सामील झालेले भागातील भाजयुमो नेते कृष्णा जयस्वाल यांनी सांगितलं की, सोनाजोरी गावातील संपूर्ण ग्रामस्थ वर पक्षाच्या बाजूने बेस्किमुडामध्ये लग्नाच्या मंडपात हजर झाले. गायन, वादनासह लोकांनी नृत्यही केलं. वधूच्या बाजूने फ्रोघी गाव बेस्कीमुडामध्ये दाखल झाले होते. हे वाचा - वैमानिक बॉयफ्रेंडनं फ्लाईटमध्येच केलं असं काही की लाजली प्रेयसी; विचित्र घटनेची रंगली चर्चा कृष्णाने म्हणाले की, पूर्ण हिंदू पद्धतीनं लग्नाचे सर्व विधी पूर्ण केले. येथे जेवणाची पूर्ण व्यवस्थाही करण्यात आली होती. याचा 1000 हून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला. दोन बेडकांचे लग्न लावले की भागात चांगला पाऊस पडतो, यावर लोकांचा पूर्ण विश्वास आहे. हा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
First published:

Tags: Marriage, Wedding

पुढील बातम्या