• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • चौथ्या मजल्यावरील स्वीमिंग पुलमध्ये मजा-मस्ती करीत होते मित्र; एकाचा पाय घसरला आणि...भयावह VIDEO

चौथ्या मजल्यावरील स्वीमिंग पुलमध्ये मजा-मस्ती करीत होते मित्र; एकाचा पाय घसरला आणि...भयावह VIDEO

या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

 • Share this:
  मेरठ, 29 ऑगस्ट : मेरठ (Meerut News) येथून एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मेरठमधील एका हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू  झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चार तरुण स्वीमिंग पुलमध्ये आंघोळ करीत आहेत. ते पुलमध्ये मजा-मस्ती करीत होते. दरम्यान एक तरुण दुसऱ्या दिशेेला धावत गेला. आणि स्वीमिंग पुलला लागून असलेल्या भिंतीवर उभा राहण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली कोसळला. (Friends were having fun in the swimming pool on the fourth floor One of the legs slipped and horrible VIDEO) हा तरुण हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला. जमिनीवर कोसळताच त्याचा मृत्यू झाला. हा व्हिडीओ 18 जुलैचा असल्याचं समोर आलं आहे. या अपघातानंतर आता सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हॉटेलच्या स्वीमिंग पुलमधील मजा-मस्ती इतकी महागात ठरू शकते, याचा विचारही त्यांनी केला नसेल. हा तरुण खाली एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कोसळला. त्यावेळी काहीजण तिथे काम करीत असल्याचं दिसत आहे. ते मुलाला उचलण्याचा प्रयत्न करीत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हे ही वाचा-महिलेने Amazon Delivery Boy कडून केली विचित्र मागणी; बिचाऱ्यावर आली ही वेळ! या प्रकरणानंतर अद्याप तरी तरुणाच्या कुटुंबीयांनी हॉटेल मालकाविरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील स्वीमिंग पुलच्या सुरक्षेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. ही भिंत अधिक उंच असल्याची मागणी केली जात आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: