मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरदेवाच्या मित्रांनी लग्नात दिलं भलतंच गिफ्ट; बॉक्स पाहताच नवरीलाही हसू आवरेना, पाहा VIDEO

नवरदेवाच्या मित्रांनी लग्नात दिलं भलतंच गिफ्ट; बॉक्स पाहताच नवरीलाही हसू आवरेना, पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नातच नवरदेवाच्या मित्रांनी स्टेजवर येत भलतीच मस्करी केली. नवरदेवाच्या मित्रांनी केलेली ही मस्करी पाहून लग्नात उपस्थित पाहुणेही हसू आवरू शकले नाहीत.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : लग्नाच्या दिवशी नवरदेवाचे मित्र उपस्थित राहणार नाहीत, असं होऊच शकत नाही. नवरदेवाचे मित्र लग्नात मजा-मस्ती करण्यासोबतच प्रँकही (Prank in Wedding) करतात. अनेकदा तर प्रँक करताना असं काही घडतं की ते पाहूनच पाहुणे हैराण होतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Wedding Video Viral) होत आहे. यात पाहायला मिळतं की लग्नातच नवरदेवाच्या मित्रांनी स्टेजवर येत भलतीच मस्करी केली. नवरदेवाच्या मित्रांनी केलेली ही मस्करी पाहून लग्नात उपस्थित पाहुणेही हसू आवरू शकले नाहीत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उपस्थित असतात. इतक्यात नवरदेवाचे काही मित्र एका मोठ्या बॉक्समध्ये काहीतरी घेऊन पाहुण्यांच्या मधून येत स्टेजवर पोहोचतात. सामान घेऊन स्टेजवर चढताना ते असं वागतात जणू या बॉक्समध्ये मोठा फ्रिज किंवा वॉशिंग मशीन आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही अजिबात असं दिसत नाही की ते काहीतरी मस्करी करणार आहेत. त्यामुळे नवरदेवालाही वाटलं की मित्रांनी काहीतरी मोठं गिफ्ट आणलं आहे.

स्टेजवर पोहोचताच मित्र नवरदेवाच्या हातात हे गिफ्ट देतात. यादरम्यान नवरीदेखील असा विचार करू लागते की यात नेमकं काय गिफ्ट असेल. नवरदेवाचे मित्र यादरम्यान नवरीसोबत फोटोही काढतात. यानंतर अखेर समजतं की या मोठ्या बॉक्समध्ये काहीच नाही. रिकामा बॉक्स पाहून नवरदेव हसू लागतो. हे पाहून नवरीलाही हसू आवरत नाही. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ala_motha_photographer नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 4 लाख 40 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

First published:

Tags: Funny video, Wedding video