मराठी बातम्या /बातम्या /Viral /चावी हाताळताना एक चूक आणि तरुणीची झाली भयंकर अवस्था; पाहून डॉक्टरही हैराण

चावी हाताळताना एक चूक आणि तरुणीची झाली भयंकर अवस्था; पाहून डॉक्टरही हैराण

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

हातात असलेल्या चावीसोबत खेळणं तरुणीला चांगलंच महागात पडलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

कॅनडा, 28 जानेवारी : आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या हातात चावी असेल तर त्याच्यासोबत खेळण्याची सवय असते. चावीत बोट घालून ती गरागरा फिरवणं असो, चावी आपल्या हातात उडवणं असो किंवा आपल्याकडून दुसऱ्याकडे चावी फेकणं असो, चावीसोबत तुम्हीसुद्धा यापैकी काही ना काही केलं असेल. पण असंच काही करणं कॅनडातील एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. तिच्यासोबत मोठी दुर्घटना झाली.

24 वर्षांची रॅनी लॅरिव्हिएर आपल्या मित्रांसोबत बाहेर जाण्याच्या तयारीत होती. ती कारमध्ये बसायला जात होती. तिच्या मैत्रिणींच्या हातात चाव्या होत्या. याचाव्या ती हातात उडवत उडवत दोघी एकमेकांशी गप्पा मारत होत्या. अचानक चाव्यांच्या गुच्छा रॅनीच्या चेहऱ्यावर गेला आणि नको तेचं घडलं. तिचा चेहरा संपूर्णपणे रक्तबंबाळ झाला.

तिची मैत्रीण घाबरली. तिने तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. रॅनी म्हणाली, तिला पाहून डॉक्टर आणि नर्सही हैराण झाले. त्यांनाही विश्वास बसत नव्हता.हे वाचा - खरंच हा 'कंबल वाले बाबा'चा चमत्कार? रुग्णावर घोंगडी टाकून आजारातून मुक्त केल्याचा दावा

चावी पूर्णपणे तिच्या गालात घुसली होती. एक्स-रे केला तेव्हा नाकाजवळ ती दीड इंचापर्यंत घुसल्याचं निदान झालं. तिच्या काही नसाही फुटल्या होत्या. ज्यामुळे रक्तस्राव खूप होत होता. दरम्यान सिटी स्कॅन करून तिची प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली. पण तिच्या मनात आता भीतीने घर केलं आहे आणि वेगळीच चिंताच तिला सतावते आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार रॅनी म्हणाली, "मला सतत असंत वाटतं की कुणीतरी चावी उडवतं आहे आणि कॅच सुटून ती माझ्या चेहऱ्यावर लागते आहे. इतकी भीती मला कधीच वाटली नव्हती. मला चेहराही जडजड वाटतो आहे"

"मला दुखापतीची भीती नव्हती कारण उपचारानंतर ते काही दिवसांत ठिक होईल हे मला माहिती आहे. पण यामुळे माझ्या डोळ्यांची दृष्टी तर जाणार नाही ना, याची चिंता आहे. कारण ही जखम डोळ्यांच्या खाली झाली आहे", असं ती म्हणाली.

हे वाचा - शिजवण्यापूर्वी चिकन धुणं धोकादायक; संशोधनात समोर आले भयंकर दुष्परिणाम

त्यामुळे यापुढे चावी हाताळताना सावधान. कारण चावीसोबत असं खेळण्याची सवय अनेकांना आहे. त्यामुळे रॅनीसोबत जे घडलं ते उद्या तुमच्यासोब किंवा इतर कुणासोबतही घडू शकतं.

First published:

Tags: Health, Lifestyle, Viral