Home /News /viral /

वेडिंग पार्टीत नवरदेवाच्या मित्राचं धक्कादायक कृत्य; पाहून नवरीही भडकली, Shocking Video

वेडिंग पार्टीत नवरदेवाच्या मित्राचं धक्कादायक कृत्य; पाहून नवरीही भडकली, Shocking Video

या घटनेनंतर नवरीचाही पारा चढल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत 42 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे.

  नवी दिल्ली 22 एप्रिल : सध्या सोशल मीडियावर एका वेडिंग पार्टीचा (Wedding Party) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात नववधू आणि नवरदेव (Bride Groom Video) केप कापण्यासाठी उभा असल्याचं दिसतं. मात्र नवरदेवाच्या मित्राने हा आनंदाचा क्षण काहीच सेकंदाच उद्धवस्त केला. त्या मित्राने पार्टीत येऊन वातावरणच बदलून टाकलं, हे सर्व पाहून नवरदेवही संतापला. पार्टीला आलेल्या नवरदेवाच्या मित्राने लग्नाचा केक स्वत:च्या हाताने फोडून पूर्णपणे उद्ध्वस्त केला. यानंतर केवळ नवरदेवाच्याच नाही तर नवरीच्याही चेहऱ्यावरील रंग उडाला. लग्नाच्या स्टेजवर आऊट ऑफ कंट्रोल झाली महिला; जे काही केलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा VIDEO या घटनेनंतर नवरीचाही पारा चढल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत 42 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरीने पांढरा गाऊन तर नवरदेवाने गडद राखाडी रंगाचा टक्सिडो घातला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला नवरी आणि नवरदेव लग्नाचा केक कापताना दिसतात. अचानक नवरदेवाचा मित्र तिथे येतो आणि आपले दोन्ही हात या केकमध्ये टाकतो. यानंतर तो नवरीच्या चेहऱ्यावर केक लावण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तो नवरदेवाकडेही जातो. हे पाहून नवरी आणि नवरदेव दोघंही त्याच्यापासून लांब जातात.
  लग्नाचा केक खराब झालेला पाहून नवरी आणि नवरदेवाचा सगळा उत्साहच नाहीसा झाल्याचं पाहायला मिळतं. हे सगळं पाहून केवळ नवरीलाच नाही, तर नवरदेवालाही राग येतो. मात्र, नवरदेवाच्या मित्राच्या या कृत्यावर हे नवविवाहित जोडपं कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. ते एकदम शांत राहातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव दिसत नाहीत. कपलने अवघ्या 100 रुपयांत खरेदी केलं घर; खोलीतून बाहेर पडताच समोरचं दृश्य पाहून बसला धक्का यानंतर नेमकं काय घडलं, हे कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी विचारलं आहे. काही वापरकर्त्यांनी कमेंट केली की नवरदेवाने मित्राचं वागणं अयोग्य असल्याने त्याला मारलं असावं. या व्यक्तीचं अशा पद्धतीचं वागणं पाहून नेटकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bridegroom, Wedding video

  पुढील बातम्या