मुंबई, 08 जानेवारी : लग्न
(Wedding video) म्हटलं की मजामस्ती आलीच. विशेषतः नवरदेवाचे मित्र नवरा-नवरीला
(Bride groom video) त्रास देण्याची किंवा त्यांची मजा लुटण्याची एक संधी सोडत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. ज्यात नवरदेवाच्या मित्राने अशी मस्करी केली की नवरीबाई अक्षरश: रडकुंडीला आली. इतकंच नव्हे तर नवरदेवही भडकला.
एका दाक्षिणात्य लग्नाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लग्नानंतरच्या काही विधींचा हा व्हिडीओ असावा असं दिसतं. ज्यात नवरदेवाचा मित्र सर्वांसमोर असं काही करतो की सर्वजण पाहतच राहतात. नवरा-नवरीही वैतागतात. असं या मित्राने नेमकं केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी रस्त्यावर एकत्र चालत आहेत. त्यांच्यासोबत इतर काही लोकही आहेत. त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार आहे. नवरी आणि नवरा दोघंही अनवाणीच चालताना दिसत आहेत. त्यांच्यापासून काही अंतरावर नवरीच्या चपला असतात. नवरी जशा चपला घालायला जाते तसं तिथं असलेला एक तरुण त्या चपला उचलतो आणि आपल्या हातात घेऊन पुढे चालू लागते.
हे वाचा - मंडपात जाण्याआधीच उतरला नवरीचा चेहरा; कारण जाणून लावाल डोक्याला हात, VIDEO
मित्राचं हे कृत्य पाहून नवरदेव भडकतो. तो या तरुणासोबत वाद घालतानाही दिसतो. जणू काही त्याला तो जाबच विचारतो. तर नवरीबाई जी आधीच थकली आहे, ती तिचा चेहरा रडवेला होतो. कशीबशी ती तशीच चालत राहते.
व्हिडीओत पुढे पाहाल तर ज्या मित्रासोबत नवरदेव वाद घालत होता तो मित्र त्याला मिठी मारतो. तेव्हा नवरदेव आणि इतर सर्वजण हसू लागतात.
हे वाचा - आपल्या GF सोबत हे काम करण्यासाठी या तरुणावर पुरुष उधळतात पैसे; कमावतो लाखो रुपये
__.nan__dul.__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एकंदरच पाहिलं तर ही एखादी प्रथा असावी असंच दिसतं आहे. ज्याप्रमाणे मेहुणी नवरदेवाचे बूट चोरते तसाच कदाचित हा नवरीच्या चपला पळवण्याचा एक खेळ असावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.