अमरेली, 07 जुलै: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहे. ज्यामध्ये 5 सिंह मध्यरात्री एका महामार्गावर (Highway) बिंदास्त संचार (5 Lions walking on road) करताना दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्यानं हे सिंह आरामात सहलीला आल्याप्रमाणे मुक्तपणे संचार करत आहेत. शहराच्या ठिकाणी अशाप्रकारे सिंहाचा वावर निदर्शनास आल्यानं परिसरातील लोकांमध्ये दहशत पसरली आहे. हे लोकं घराच्या बाहेर निघायलाही घाबरत आहे. हा व्हिडीओ काही आफ्रिका किंवा अन्य देशातला नसून हा व्हिडीओ भारतातला असल्याचा दावा केला जात आहे.
मध्यरात्री महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीनं सिंहाचा हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ गुजरातमधील अमेरेली- राजुला महामार्गावरील असल्याचा दावा सोशल मीडियातून केला जात आहे. एकाच वेळी पाच सिंहांचा रस्त्यावरचा असा मुक्त संचार फारच कमी लोकांनी यापूर्वी पाहिला असेल. पण या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
This is not #Africa it's #India a pride of lions walking at Pipavav port. #Rajulacity #Gujarat #saurastra #asiaticlion #gir #girlion #IncredibleIndia #Mumbai #goodmorning pic.twitter.com/GQ8Ic8bwBY
— Old Bombay (@oldmumbai) July 6, 2021
खरंतर, यापूर्वी बिबटे किंवा वाघ रस्त्यावर असं फिरताना आढळले आहेत. पण पहिल्यांदाच अशाप्रकारे 5 सिंह एकत्र फिरताना दिसत आहेत. 5 सिंह एक संचार करतानाचा हा व्हिडीओ @oldmumbai नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. 'हा व्हिडीओ आफ्रिका देशातील नसून गुजरातमधील पीपावाव पोर्ट येथील असल्याचा दावा' या ट्वीटर अकाऊंटवरून करण्यात आला आहे.
हेही वाचा-नवरदेवाला पाहताच उडाला नवरीच्या चेहऱ्याचा रंग; ढसाढसा रडली आणि...; पाहा VIDEO
या व्हिडीओत, तुम्ही पाहू शकता, एक मादी सिंह आपल्या काही पिल्लांसोबत हा मुक्त संचार करत आहे. मध्यरात्री सिंहाचा हा संचार सुरू असल्यानं काही कुत्रे भुंकतानाचा आवाज बॅकग्राऊंडला येत आहे. पण रात्रीच्या वेळी रस्तावर लोकांचा वावर नसल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat, Shocking viral video, Video viral