मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चार बहिणींनी केली वयाची 92 वर्षं पूर्ण; नवा विक्रम करत गिनिज बुकात नोंद

चार बहिणींनी केली वयाची 92 वर्षं पूर्ण; नवा विक्रम करत गिनिज बुकात नोंद

साधारणपणे जगभरात 65-68 वर्षं इतकं सरासरी आयुर्मान आहे.

साधारणपणे जगभरात 65-68 वर्षं इतकं सरासरी आयुर्मान आहे.

साधारणपणे जगभरात 65-68 वर्षं इतकं सरासरी आयुर्मान आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • | california

जगात अनेक जण वेगवेगळे विक्रम करताना दिसतात. कुणी काही नवीन गोष्ट केली तर त्याच्या नावाचा विक्रम प्रस्थापित होतो. अनेक जण यासाठी विशेष मेहनत करतात. काही जणांच्या बाबतीत नियतीच चमत्कार घडवते. मग अशा माणसांच्या नावे विक्रम तयार होतात. अशाच चार बहिणींच्या बाबतीत एक गोष्ट घडली आहे. नियतीने त्यांना दीर्घायुष्याची देणगी दिली आहे. या देणगीमुळे या चौघी जणी जगातल्या सर्वांत दीर्घायुषी बहिणी बनल्या आहेत.

आधीचा जागतिक विक्रम मोडला -

कॅलिफोर्नियात राहणाऱ्या जॉन्सन भगिनींचं नाव गिनिज बुकात नोंदवलं गेलं आहे. त्या प्रत्येकीने वयाची 92 वर्षं पूर्ण केली आहेत. त्यांच्या वयांची बेरीज 389 वर्षं इतकी येते. हाच एक मोठा विक्रम आहे. यापूर्वी गोबेल कुटुंबातल्या भावंडांच्या नावे 383 वर्षांच्या एकत्रित वयाचा अर्थात कंम्बाईन एजचा विक्रम होता. तो आता जॉन्सन भगिनींनी मोडला आहे.

चारही बहिणींचं वय 92 वर्षांच्या पुढे - 

साधारणपणे जगभरात 65-68 वर्षं इतकं सरासरी आयुर्मान आहे. कॅलिफोर्नियातील या बहिणी मात्र निरोगी दीर्घायुष्य जगत आहेत. लोकांना प्रेरणा, स्फूर्ती देत आहेत. या चौघींचं वय मिळून 389 वर्षं आणि 197 दिवस इतकं आहे. प्रत्येकीच्या वयाचा विचार केला, तर सगळ्यात मोठी बहीण अर्लोविन जॉन्सन ओव्हरस्कीचं वय 101 वर्षं आहे. मर्सिन जॉन्सन स्कलीचं वय 99 वर्षं, डोरिस जॉन्सन गॉडिनिरचं वय 96 आणि सगळ्यात धाकटी ज्युल जॉन्सन बेकचं वय 93 वर्षं आहे. या सगळ्याजणी अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरात राहतात; पण उन्हाळ्याच्या दिवसांत वर्षातून एकदा जरूर भेटतात.

चौघींचं बॉंडिंग आहे चांगलं -

'मॅडिसन डेली लीडर'च्या रिपोर्टनुसार, चौघी जणी फोनच्या माध्यमातून एकमेकींच्या संपर्कात असतात. चौघींचे स्वभाव खूपच वेगळे आहेत; पण तरीही त्यांच्यात खूप चांगलं बॉंडिंग आहे. वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी स्फूर्ती कुठून मिळाली याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही अजूनही जिवंत आहोत, हीच सेलिब्रेट करण्यासारखी गोष्ट आहे.

हेही वाचा - तुमच्या मुलाचाही हाईटचा प्रॉब्लेम आहे? फॉलो करा या 5 टिप्स, टीनएजनंतरही वाढेल उंची

दीर्घायुष्य ही मोठी देणगी आहे. त्यासाठी संतुलित आहार आणि जीवनशैली असायला हवी. जॉन्सन भगिनी आजही निरोगी आहेत. प्रत्येक जण किती आयुष्य जगणार हे पूर्णपणे आपल्या हातात नसलं, तरी चांगल्या सवयी लावून, फिटनेस राखून दीर्घायुषी होणं शक्य आहे, हे या भगिनींच्या उदाहरणावरून कळून येतं.

First published:

Tags: Woman, World record