मराठी बातम्या /बातम्या /Viral /

...अन् उभ्या उभ्या निर्जीव पुतळा झाली जिवंत माणसं; पाहा मृत्यूचा भयावह LIVE VIDEO

...अन् उभ्या उभ्या निर्जीव पुतळा झाली जिवंत माणसं; पाहा मृत्यूचा भयावह LIVE VIDEO

झाडाखाली उभ्या राहिलेल्या चौघांनाही एकाच वेळी मृत्यूने गाठलं.

झाडाखाली उभ्या राहिलेल्या चौघांनाही एकाच वेळी मृत्यूने गाठलं.

पाऊस पडत होता म्हणून चार लोकांनी झाडाखाली आसरा घेतला आणि मृत्यू त्यांच्यावर कोसळला.

    मुंबई, 12 ऑगस्ट : मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. अशाच मृत्यूचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चार माणसं एकाच वेळी उभ्या उभ्या जिवंत पुतळा झाली आणि जमिनीवर कोसळली. अवघ्या काही सेकंदातच चौघांचाही एकाच वेळी मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. पावसाळ्यात बऱ्याच दुर्घटना घडत असतात. पूर, दरड कोसळणे, वीज कोसळणे अशा घटनांमध्ये काही लोक आपला जीव गमावतात. पावसातील या दुर्घटना नैसर्गिक असल्या तरी बऱ्याचदा आपला निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. असाच हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता चार लोक एका झाडाखाली उभे आहेच. पाऊल कोसळतो आहे. पावसापासून बचावासाठी म्हणून त्यांनी झाडाचा आसरा घेतला आणि अचानक त्याच झाडावर वीज कोसळली आणि चारही जण धाडकन जमिनीवर कोसळते आणि काही वेळसाठी आग पेटून ती विझते. पण त्यानंतर तीन लोक लगेच जमिनीवर पडले तर चौथी व्यक्ती काही सेकंद पुतळ्यासारखीच उभी होती आणि तशीच्या तशी ती जमिनीवर पडले. चौघंही उभ्या उभ्या निर्जीव पुतळा बनले. अवघ्या काही सेकंदात सर्वांचा मृत्यू झाला. हे वाचा - अद्भुत! धरतीवरून अवकाशात कोसळली वीज, कधीच पाहिला नसेल असा निसर्गातील चमत्कार; Watch Video पावसात झाडाखाली कधीच उभं राहू नये, असं सांगितलं जातं. तरी लोक झाडाखाली जातात. त्याचा किती भयानक परिणाम होऊ शकतो ते तुम्ही या व्हिडीओत पाहिलात. त्यामुळे आता पाऊस पडल्यावर त्यात भिजणं पत्करा पण झाडाखाली चुकूनही उभं राहू नका. @TansuYegen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स घाबरले आहेत. हे भयानक दृश्य असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. झाडाखाली आश्रय घेणाऱ्यांना वीज पडण्याचा धोका जास्त असतो. या घटनेला 'साइड फ्लॅश' म्हणतात. असे तेव्हा घडते जेव्हा वीज व्यक्तीच्या जवळ असलेल्या लांबलचक वस्तूवर पडते आणि विद्युत प्रवाहाचा एक भाग त्या लांब वस्तूद्वारे पीडितपर्यंत पोहोचते. भारतातील मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे झाडाखाली किंवा जवळ उभ्या असलेल्या लोकांचे झाले आहेत. हे वाचा - वीज अंगावर पडल्यानंतरही वाचू शकतो जीव, फक्त एक काम करावं लागेल आकाशातून वीज पडणे ही अत्यंत गंभीर घटना आहे, जी जीवघेणी आहे. मात्र, पीडितेला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. एखाद्या व्यक्तवर वीज पडल्यानंतर काय करावं? विजेच्या धक्क्यानंतर जास्तीकरुन हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे, सर्वप्रथम पीडितेच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास चालू आहे की नाही हे पहा. जर ती व्यक्ती श्वास घेत नसेल तर त्यांना तोंडाने श्वास देण्याचा (CPR) प्रयत्न करा. जेव्हा हृदयाचे ठोके थांबतात तेव्हा सीपीआरसह छाती जोराने दाबण्याचा प्रयत्न करा. एकाच ठिकाणी दोनदा वीज पडू शकते, त्यामुळे जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे विजेचा धोका जास्त असेल, तर रुग्णाला ताबडतोब लांब न्या. जेव्हा विजेचा धक्का बसतो तेव्हा एखाद्या व्यक्तीची हाडे मोडली जाऊ शकतात किंवा त्याची दृष्टी किंवा ऐकू येऊ शकते. त्यामुळे या गोष्टी तपासा. जेव्हा विजेचा धक्का बसतो तेव्हा एखाद्या व्यक्तीची हाडे मोडली जाऊ शकतात किंवा त्याची दृष्टी किंवा बहिरेपणा येऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी तपासा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Death, Viral, Viral videos

    पुढील बातम्या