VIDEO : 'ए इकडे ये, माझ्या पायातले बूट काढ' आदिवासी मुलाला बोलावून घेऊन वनमंत्र्यांची मुजोरी

VIDEO : 'ए इकडे ये, माझ्या पायातले बूट काढ' आदिवासी मुलाला बोलावून घेऊन वनमंत्र्यांची मुजोरी

हे मंत्री महोदय एका एलिफंट कॅम्पचं उद्घाटन करायला आले होते त्यावेळी त्यांनी एका आदिवासी मुलाला बोलवलं आणि त्यांचे बूट काढायला लावले.

  • Share this:

उदगमंडलम, 6 फेब्रुवारी : मंत्र्यांचे दौरे म्हटलं की त्यांचा मोठा जामानिमा असतो. त्यांची सरबराई करण्यात सगळेच दंग असतात. एवढं सगळं होतं असतानाही एका मंत्री महोदयांनी मुजोरी करत एका आदिवासी मुलाला आपल्या पायायले बूट उतरावयला लावले. तामिळनाडूचे वनमंत्री डिंडीगुल श्रीनिवासन यांचं हे घृणास्पद कृत्य बघा. हे मंत्री महोदय एका एलिफंट कॅम्पचं उद्घाटन करायला आले होते त्यावेळी त्यांनी एका आदिवासी मुलाला बोलवलं आणि त्यांचे बूट काढायला लावले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरांतून यावर टीका होतेय.

या व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. 'ए इकडे ये, माझ्या पायातले बूट काढ', असं हे वनमंत्री त्याला सांगतायत. श्रीनिवासन हे मुदुमलाई व्याघ्रप्रकल्पात (Mudumalai Tiger Reserve)एलिफंट कॅम्पचं उद्घाटन करायला गेले होते. तेव्हा जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसमोरच ही घटना घडली. त्यांनी असं सांगितल्यानंतर या आदिवासी मुलानेही मुकाट्याने त्यांचे बूट काढले.

(हेही वाचा : फोन टॅपिंग: एकनाथ खडसेंचा 'महाआघाडी'ला पाठिंबा? मध्यावधीबाबत केला दावा)

या घटनेनंतर श्रीनिवासन यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार कारवाई करावी,अशी मागणी होतेय. याआधीही श्रीनिवासन यांनी 2018 मध्ये एका अधिकाऱ्याकडून आपले सँडल घालून घेतले होते. त्यानंतरही या मंत्र्यांची मुजोरी सुरुच राहिली हेच या व्हिडिओवरून दिसून येतंय.

===================================================================================

First published: February 6, 2020, 7:49 PM IST

ताज्या बातम्या