VIDEO : नायजेरियन युवकाने गायलं महानायकाचं गाणं, 'रोते रोते हसना सीखो...'ची परदेशातही क्रेझ

VIDEO : नायजेरियन युवकाने गायलं महानायकाचं गाणं, 'रोते रोते हसना सीखो...'ची परदेशातही क्रेझ

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावरून स्पष्ट होत आहे की, बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) फॅन फक्त भारतातच नाहीत तर देशाबाहेरही आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे चाहते देशभरात आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांचेही लाखो चाहते आहेत. पण आता असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावरून स्पष्ट होत आहे की, बिग बींचे फॅन फक्त भारतातच नाहीत तर देशाबाहेरही आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांचे 'रोते रोते हसना सिखो...' हे प्रसिद्ध गाणे या व्हिडीओतील तरुण गाताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेहमी रंजक व्हिडीओ शेअर करणारे इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये हा तरुण फक्त गाणं गात नसून, त्यावर त्याला उमजेल अशा पद्धतीने थिरकत देखील आहे. हे गाणं म्हणताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट झळकत आहे. दरम्यान हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत स्पष्टता नसली तरी, कमेंट बॉक्समध्ये एका युजरने या व्हिडीओची यूट्यूब लिंक शेअर करत अशी माहिती दिली आहे की हा व्हिडीओ नायजेरिया (Nigeria) मधील आहे.

'अंधा कानून' या चित्रपटातील हे गाणं असून ते महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झाले आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर एका युजरने अशी कमेंट देखील केली आहे की, आताच्या काही गायकांपेक्षाही या तरुणाचा आवाज चांगला आहे. तर काहींनी त्यांच्या आनंदी असण्याचे कौतुक केले आहे. या व्हिडीओला 7.5 हजारापेक्षा जास्त VIEWS मिळाले असून जवळपास 800 लोकांनी यावर कमेंट केली आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 30, 2020, 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading