नवी दिल्ली 04 डिसेंबर : अनेकदा जेवण करत असताना अन्नाचा तुकडा गळ्यात किंवा श्वासनलिकेत अडकल्यास आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. अनेक लोकांचा तर अशा घटनांमध्ये जीवही जातो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की अशी परिस्थिती आपल्यावर आल्यास काय करायला हवं. ही घटना ब्राझीलच्या साओ पाओला येथील आहे. इथे रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका 38 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यात अन्नाचा तुकडा अडकला. यानंतर काहीच वेळात तो बेशुद्ध झाला. यानंतर जे काही घडलं ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या गळ्यात जेवण करत असतानाच अन्नाचा तुकडा अडकतो. यामुळे त्याला त्रास होऊ लागतो. यानंतर काहीच वेळात तो बेशुद्ध होऊन टेबलवर कोसळतो. यानंतर मागे बसलेल्या महिलेला हे जाणवताच ती या व्यक्तीच्या जवळ येते. यादरम्यान इतरही लोक तिथे जमा होतात. सर्व या व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. मात्र हा व्यक्ती काहीच हालचाल करत नाही. यानंतर लोक वेटरला बोलवतात. यानंतर वेटर जे काही करतो ते पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल (Waiter Saved Life of a Man)
.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वेटर या व्यक्तीला मागील बाजूने पकडून जोरजोरात उठवतो आणि धक्के देतो. यानंतर एक पोलिसही तिथे येऊन वेटरची मदत करतो. यानंतर या व्यक्तीच्या गळ्यात अडकलेला तुकडा बाहेर पडतो आणि तो श्वास घेऊ लागतो. वेटर आणि पोलीस मिळून या व्यक्तीचा जीव वाचवतात.
A waiter and a highway police officer saved the life of a 38-year old man who passed out after choking on his food at a restaurant in São Paulo, Brazil last Friday. pic.twitter.com/LlHa3uwrE9
— GoodNewsCorrespondent (@GoodNewsCorres1) December 2, 2021
हा व्हिडिओ GoodNewsCorrespondent नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एका दिवसाआधी शेअर झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 30 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर ९०० हून अधिकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका यूजरने कमेंट करत लिहिलं, सुदैवाने वेटरने वेळेवर येत या व्यक्तीचा जीव वाचवला. अशा लोकांना सलाम, तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, वेटरचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तर आणखी एकाने म्हटलं की असे लोकच खरे हिरो आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Video Viral On Social Media