Home /News /viral /

तोंडाला पाणी सुटण्याऐवजी चढला रागाचा पारा; Flying Dahi Vada Video पाहून भडकले नेटिझन्स

तोंडाला पाणी सुटण्याऐवजी चढला रागाचा पारा; Flying Dahi Vada Video पाहून भडकले नेटिझन्स

फ्लाइंग दहीवड्याचा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सनी विक्रेत्याला ट्रोल केलं आहे.

  भोपाळ, 11 मे : सोशल मीडियावर खाद्यपदार्थांचेही बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही रेसिपीचे असतात तर काही फूड विक्रेत्यांचे असतात. ज्यांचे पदार्थ युनिक असतात किंवा त्यांची बनवण्याची, विकण्याची स्टाईल वेगळी असते. काही दिवसांपूर्वी असेच विक्रेते सोशल मीडियावर फेमसही झाले. असाच आणखी एका विक्रेत्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. पण त्याला ट्रोल केलं जातं आहे (Flying Dahi Vada Video). एका दहीवडा विक्रेत्याचा हा व्हिडीओ आहे. जो फ्लाइंग दहीवडा विकतो आहे. आता हा कोणता दहीवडा कोणता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हा विक्रेता ट्रोल होण्याचं कारण हाच फ्लाइंग दहीवडा आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आधी एका वाटीत वडा घेतो. त्यावर दही टाकतो. त्यानंतर दहीवडा असलेली ही वाटी हवेत भिरकावतो. हवेत गोल फिरत ही वाटी पुन्हा त्या व्यक्तीच्या हातात येते. त्यानंतर तो त्यावर मसाला टाकून ग्राहकांच्या हातात देतो. तसा हा तुम्ही आम्ही खात असलेला साधा दहीवडाच पण हा विक्रेता अशा पद्धतीने हवेत उडवत असल्याने त्याला फ्लाइंग दहीवडा म्हटलं जात आहे. हे वाचा - बाईकला धडक देणाऱ्या महिला कार चालकासोबत तरुणाचं शॉकिंग कृत्य; हैराण करणारा VIDEO या विक्रेत्याची दहीवडा बनवण्याची पद्धत सामान्य आहे पण ती सर्व्ह कऱण्याची पद्धत हटके आहे. दहीवडा सर्व्ह करण्याच्या त्याच्या हटके स्टाईलमुळे त्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आता दहीवडा असलेली अशी वाटी हवेत भिरकावण्याचा प्रयत्न आपण केला तर साहजिकच ती उलटी होईल. त्यातील दहीवडा बाहेर पडेल पण ही व्यक्ती ते अलगदपणे झेलते. त्यामुळे काहींनी त्याचं कौतुक केलं.
  पण बहुतेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे. अशी सर्कस केल्याने काय होणार आहे? नीट तर बनवू शकता, हवेत जाऊन ना त्यात काही मिक्स झालं, ना ते एकत्र झालं. या काकांना असंच कॅच कॅच खेळायची हौस असेल. अशी कमेंट काही युझर्सनी दिली आहे. हे वाचा - काय म्हणावं याला! 135 मुलांचा बाप, 125 नातवंडांचा आजोबा; 28 बायकांसमोर बांधली 37 वी लगीनगाठ इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या इंदूरमधील आहे. या फ्लाइंग दहीवड्याची किंमत 40 रुपये आहे. किमत जास्त असल्याचं सांगतही काही जणांनी ट्रोल केलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या