मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! एवढ्याशा माशीची हिंमत तर पाहा; चक्क बेडकालाच घेऊन उडाली; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

OMG! एवढ्याशा माशीची हिंमत तर पाहा; चक्क बेडकालाच घेऊन उडाली; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

माशीची शिकार करणं बेडकाला चांगलंच महागात पडलं आहे.

माशीची शिकार करणं बेडकाला चांगलंच महागात पडलं आहे.

माशीची शिकार करणं बेडकाला चांगलंच महागात पडलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 02 जुलै : दोन वेगवेगळ्या ताकदीचे जीव एकमेकांसमोर आले तर साहजिकच जास्त ताकदीच्या जीवासमोर कमी ताकदीच्या जीवाचं काहीच चालत नाही. पण सध्या असा व्हिडीओ व्हायरल (Social media viral video) झाला आहे, ज्यामध्ये थेट याच्या उलटं घडलं आहे. अगदी बेडकाच्या फक्त जिभेच्या टोकावर राहिल एवढ्याशा माशीनं (Fly) चक्क बेडकाला (Frog) हवेत उडवत नेलं आहे.

बेडूक आणि माशीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात माशीची शिकार करणं बेडकाला चांगलंच महागात पडलं आहे. काही क्षणातच संपूर्ण डाव पलटला आहे.

व्हिडीओत पाहू शकता, बेडूक पाण्यात आहे. हवेत उडणाऱ्या एका माशीला तो आपलं भक्ष्य बनवण्याच्या तयारी आहे. आपली लांबलचक जीभ बाहेर काढून तो पटकन त्या माशीला आपल्या जिभेवरही घेतो. तिला गिळंकृत करण्याच्या तयारी असताच उलटच घडतं. माशी आपली इतकी ताकद लावून उडते की चक्क बेडकालाही ती उचलते. आपण बेडकाच्या तावडीतून सुटावं यासाठी माशी शक्य तितका पूर्ण जोर लावते आणि ती या बेडकाला घेऊनच उडते.

हे वाचा - Shocking Viral Video :साप नाकात घालून तोंडातून काढला बाहेर,अंगावर काटा उभा राहील

बिचारा बेडूक. शिकार करायला माशीची पण त्याला आपण सर्वात मोठी चूक केली असंच झालं असावं. माशीच्या तावडीतून सुटण्यासाठी तो धडपड करतो, पण माशीच्या तावडीतून त्याची काही सुटका होत नाही. माशी त्याला उचलून भुर्रकन उडतच जाते.

First published:

Tags: Other animal, Shocking viral video, Viral, Viral videos