मराठी बातम्या /बातम्या /Viral /धक्कादायक! प्रवाशाने उघडलं उडत्या विमानाचं दार, प्लेनमध्ये हवा घुसली अन्...; Shocking Video

धक्कादायक! प्रवाशाने उघडलं उडत्या विमानाचं दार, प्लेनमध्ये हवा घुसली अन्...; Shocking Video

उडत्या विमानाचा दरवाजा उघडला.

उडत्या विमानाचा दरवाजा उघडला.

उडत्या विमानाचं दार उघडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सिऊल, 26 मे : उडत्या विमानाचं दार उघडलं तर काय होईल, असा प्रश्न कधी ना कधी तुम्हाला पडला असेल. आता हे तुम्हाला प्रत्यक्षच पाहायला मिळेल. कारण असा एक व्हिडीओ समोर आला आहे. उडत्या विमानाचं दार अचानक उघडलं. त्यानंतर विमानात हवा घुसली आणि पुढे जे घडलं ते भयंकर आहे. दक्षिण कोरियातील ही धक्कादायक घटना आहे.

दक्षिण कोरियाच्या एशियाना एअरलाइन्सच्या विमानातील ही घटना. एअरलाइन्सच्या माहितीनुसार एअरबस A231 विमान दक्षिणपूर्व शहर दाएगूहून दक्षिणी द्वीप जेजुला जात होतं. या विमानात 194 प्रवासी होतं. यापैकी एका प्रवाशाने प्लेनचा एमर्जन्सी डोअर अचानक उघडण्याचा प्रयत्न केला.

त्या प्रवाशाला रोखण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण त्याने कुणाचंच ऐकलं नाही. शेवटी त्याने उडत्या विमानाचा दरवाजा उघडलाच. विमानाचं आपात्कालीन दरवाजा उघडताच विमानात हवा भरली.

विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताच महिला शॉक; रात्रीच्या प्रवासात काय दिसलं पाहा VIDEO

याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात विमानातील भयंकर दृश्य दिसतं आहे. विमानातीलच एका प्रवाशाने विमानातील हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सर्व प्रवासी जीव मुठीत धरून आपल्या खुर्चीवर बसले आहेत. विमानात हवा घुसली आहे आणि विमान हलतं आहे. हवेचा वेग तुम्ही पाहू शकता खुर्चीवर कव्हर, लोकांचे केस उडताना दिसत आहे. हे दृश्य पाहूनच आपल्याला धडकी भरते. तर जे लोक तिथं प्रत्यक्षात होतं, त्यांचं काय झालं असेल, याची कल्पनाही नकोशी वाटते.

विमान प्रवासातील सर्वात घाणेरड्या गोष्टी; एअर हॉस्टेसनेच उलगडले प्लेनमधील डर्टी सिक्रेट्स

सुदैवाने विमानाचं सुरक्षिक लँडिंग झालं आहे. सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. काही प्रवाशांना रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे.

माहितीनुसार विमानाचं दार उघडणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

First published:
top videos

    Tags: Airplane, Viral, Viral videos