मुंबई, 5 एप्रिल : आपल्याला दिसत नसल्या तरी वन्य प्राण्यांनाही अनेकदा त्यांच्या क्षेत्राच्या सीमा असतात. कुणाचं अघोषित साम्राज्य जंगलात असतं तर कुणी पाण्यामध्ये राज्य करतं. मात्र दोन्ही ठिकाणच्या अशा राजांची क्वचित जुगलबंदी रंगते तेव्हा काय होतं?
हा सामना खरोखरच खूप थरारक आणि रंजक असतो. या व्हिडिओत असं काही तुम्हाला पहायला मिळेल ज्यातून अगदी अंगावर शहारे येतील. 'जंगलाचा राजा' आणि 'समुद्राचा बादशहा' इथं समोरासमोर आले आहेत.
या रोमांचक संघर्षात तब्बल पाच सिंहीणी मिळून एका मगरीवर हल्ला चढवत आहेत. मात्र मगरीची हिम्मत अजिबात ढासळली नाही. तिनं प्रसंगावधान दाखवत आपली सुटका करून घेतली.
हेही वाचा याला म्हणतात कोरोना Holi celebration; तरुणांचा हटके व्हिडीओ व्हायरल
Five lionesses Trying to prey on a crocodile. pic.twitter.com/iMQHdSRaoM
— Life and nature (@afaf66551) March 27, 2021
असं म्हणतात, की जंगलातील हिंस्त्र प्राणी जेव्हा आपसात लढतात तेव्हा पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही. हा व्हिडिओसुद्धा तसाच आहे. यात दिसतं की नदीच्या किनारी एक मगर आराम करते आहे. तितक्यात पाच सिहिणींचा कळप तिथं येतो. त्या मगरीला घेरत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागतात.
हेही वाचा 'मिसळीबरोबर पाव की ब्रेड' यावर माहिश्मतीला होणार युद्ध, पाहा काय 'कट' शिजतोय कट
मात्र मगर अतिशय चपळ आणि बुद्धिमान आहे. तिनं एकदम कौशल्यानं या सिहिणींना हुलकावणी दिली. अगदी काही क्षण मगर आणि सिहिणींमध्ये संघर्ष चालतो. मग मात्र त्या बघतच राहिल्या आणि ही मगर सुळकन पाण्यात गायब झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Viral video., Wild animal