मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पकडत होते मासे, मिळाला खजिना; मच्छिमार झाले मालामाल

पकडत होते मासे, मिळाला खजिना; मच्छिमार झाले मालामाल

कुणाला, कधी आणि काय सापडल्यामुळे त्याचं नशीब फळफळेल, हे सांगता येत नाही. मच्छिमारांना नुकत्याच अशा काही वस्तू सापडल्या, ज्यामुळे ते रातोरात मालामाल झाले.

  • Published by:  desk news

जकार्ता, 17 डिसेंबर: नेहमीप्रमाणे पाण्यात मासेमारी (Fishing) करण्यासाठी उतरलेल्या मच्छिमारांना (Fishermen) अचानक अशी एक वस्तू (Precious thing) सापडली, ज्यामुळे ते मालामाल झाले. पाण्यात जाळं टाकून दिवसभर बसणे आणि मिळतील तेवढे मासे बाजारात विकून संसार चालवणं, हा मासेमारांचा दिनक्रम. एखाद्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त मासे सापडणं, हीच काय ती त्यांची चैन. मात्र एक दिवस मासेमारांना नदीत असं एक घबाड सापडलं, ज्यामुळे ते अक्षरशः मालामाल झाले.

नदीत मिळाले बॉक्स़

इंडोनेशियात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या काही मच्छिमारांना नदीत काही बॉक्स तरंगत असल्याचं आढळलं. त्यांनी आपल्या होड्या त्या बॉक्सपाशी नेल्या आणि ते बॉक्स होडीत ओढून घेतले. ते बॉक्स फोडण्यात आले आणि त्यातील साहित्य पाहून सर्वांचेच डोळे आनंद आणइ आश्चर्यानं मोठे झाले.

काय होतं बॉक्समध्ये?

मासेमारांना सापडलेल्या बॉक्समध्ये ऍपल कंपनीचे मोबाईल फोन्स आणि लॅपटॉप असल्याचं त्यांना आढळलं. त्यांनी सर्व बॉक्स फोडले आणि ऍपलचे ते प्रॉडक्ट्स आपापसात वाटूनही घेतले. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला आणि तोदेखील टिकटॉकवर टाकला. नशीब फळफळतं ते असं, अशी टॅगलाईन देत त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

हे वाचा- क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये 2021मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, WazirX ला सर्वाधिक पसंती

फोटोंना जोरदार प्रतिसाद

या पोस्टला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडोनेशियातील बांग्का बेलितुंग नदीपात्रात हे बॉक्स मासेमारांना सापडले आहेत. त्यात महागडे आयफोन्स, आयपॅड आणि मॅकबुक्स आहेत. या सर्व वस्तूंसह मासेमारांनी फोटो काढले असून तेदेखील सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. टिकटॉकवर हा व्हिडिओ आतापर्यंत 18 लाखपेक्षा अधिक जणांनी पाहिला असून 1 लाख 18 हजार जणांनी तो लाईक केला आहे. या घटनेनंतर मासेमारांचं नशीब या विषय़ावर सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली आहे.

First published:

Tags: Apple, Fish, Indonesia