मराठी बातम्या /बातम्या /Viral /हा मासा आहे की बर्गर? मच्छिमाराला समुद्रात सापडलं असं काही की पाहून तुम्हीही विचारात पडाल

हा मासा आहे की बर्गर? मच्छिमाराला समुद्रात सापडलं असं काही की पाहून तुम्हीही विचारात पडाल

पहिल्या नजरेत हा मासा पनीर चीज बर्गरसारखाच (Cheeseburger Fish)दिसेल. मात्र लक्ष देऊन पाहिल्यास समजेल की हे बर्गर नसून मासा आहे.

पहिल्या नजरेत हा मासा पनीर चीज बर्गरसारखाच (Cheeseburger Fish)दिसेल. मात्र लक्ष देऊन पाहिल्यास समजेल की हे बर्गर नसून मासा आहे.

पहिल्या नजरेत हा मासा पनीर चीज बर्गरसारखाच (Cheeseburger Fish)दिसेल. मात्र लक्ष देऊन पाहिल्यास समजेल की हे बर्गर नसून मासा आहे.

नवी दिल्ली 03 डिसेंबर : समुद्राच्या दुनियेत अनेक रहस्यमयी (Mysterious Aquatic Life) गोष्टी उपलब्ध आहेत. या जगात असे अनेक जीव आहेत, ज्यांना पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही, की खरंच असे जीव जगात आहेत का. समुद्राच्या खोलातून हे जीव अनेकदा बाहेर येतात. यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाच एका माशाचा फोटो सध्या चांगलाच शेअर केला जात आहे. पहिल्या नजरेत हा मासा पनीर चीज बर्गरसारखाच (Cheeseburger Fish) दिसेल. मात्र लक्ष देऊन पाहिल्यास समजेल की हे बर्गर नसून मासा आहे. 39 वर्षाच्या रोमन फेडोरत्सोव यांच्या जाळ्यात अडकलेला हा मासा (Weird Fish) पाहून सगळेच हैराण झाले. काहींनी हे दात असलेलं चीजबर्गर असल्याचं म्हटलं तर काहींनी याला निंजा टर्टलचं छोटं रूप म्हटलं.

समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छिमाराच्या जाळ्यात हा मासा अडकला. जेव्हा त्याने पहिल्यांदा हा मासा पाहिला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. पहिल्या नजरेत त्याला हे दात असलेलं चीज बर्गर वाटलं. रशियामध्ये राहणाऱ्या मच्छिमाराला अचानकच हा मासा आढळला. या माशावर नजर पडताच त्याने याचा फोटो शेअर केला.

इन्स्टाग्रामवरही त्याने हा फोटो पोस्ट केला. लोकांनी या फोटोवर अनेक प्रकारच्या कमेंट केल्या. अनेकांनी हा मासा चिनक सँडविचप्रमाणे दिसत असल्याचं म्हटलं.

माशाचा फोटो पोस्ट करत रोमनने लिहिलं, हे कसल्या प्रकारचं सँडविच आहे? हा फास्ट फूड चेनचा भाग पाहिजे का? पोस्ट करताच हजारो लोकांनी फोटो लाईक केला आहे. एक व्यक्तीने कमेंट करत विचारलं, हा मासा आहे की बर्गर? दिसायला हा मासा खरंच अतिशय घाणेरडा दिसत आहे.

रोमन अनेकदा असे मासे पकडून इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. लोकही हैराण होतात की अखेर त्याला असे मासे सापडतात कुठे. अनेक मासे तर दिसायलाच एलियनप्रमाणे दिसतात. तर अनेक मासे भीतीदायक असतात. सध्या मात्र या चीज बर्गरप्रमाणे असलेल्या माशाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

First published:

Tags: Fish, Viral photo