मुंबई, 04 फेब्रुवारी : मासेमारी म्हणजे मासे पकडणे ही देखील एक कला आहे. सोशल मीडियावर अनेक मच्छिमारांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. हे व्हिडीओ कधी मोठ्या समुद्रातील असतात, तर कधी छोट्या तलावातील. पण मासे पकडताना पाहाणं हे खरंच मनोरंजक असतं.
सध्या यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला खूपच मनोरंजक वाटेल.
एक व्यक्ती एका छोट्या तलावात प्रवेश करताच, मोठे मासे त्या तलावातून उडी मारू लागतात.
वास्तविक, हा व्हिडिओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एक व्यक्ती एका छोट्या तलावात शिरल्याचे दिसत आहे. हा तलाव पाहता अगदी लहान दिसत आहे. पण त्यामध्ये असंख्य मासे आहेत. खरंतर हा तलाव शेतात बांधण्यात आला आहे. जो मासे पाळण्यासाठी बनवण्यात आल्याचं दिसत आहे.
नंतर ती व्यक्ती हळूहळू तलावात शिरते. तो पर्यंत सगळं शांत असतं, त्यानंतर मात्र मासे असे काही उड्या मारु लागतात की ते पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. हा व्हिडीओ खूपच मनोरंजक आहे.
View this post on Instagram
आधी ती व्यक्ती आत पाण्यात जाते आणि मग तलावाच्या मध्यभागी जाऊन पाय हलवायला लागतो आणि जवळजवळ खाली बसतो. त्यानंतर जे घडले ते व्हायरल झाले. ती व्यक्ती मध्येच जाताच तलावातून मोठमोठे मासे उड्या मारू लागले. मासे बाहेर येताच आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडण्यास सुरुवात केली.
इतक्या लहान तलावातून एवढे मोठे मासे बाहेर येतील याची लोकांना कल्पनाही नव्हती. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Social media, Social media trends, Top trending, Viral