मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मासे पकडायला गेला आणि स्वतःच भल्यामोठ्या माशाची शिकार झाला; थरारक VIDEO

मासे पकडायला गेला आणि स्वतःच भल्यामोठ्या माशाची शिकार झाला; थरारक VIDEO

जेव्हा शिकारीच शिकार होतो तेव्हा...

जेव्हा शिकारीच शिकार होतो तेव्हा...

जेव्हा शिकारीच शिकार होतो तेव्हा...

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 29 मे : खेळ असो, युद्ध असो किंवा शिकार बाजी कधी पलटेल याचा अंदाज नाही. अनेकदा आपण असं काम करायला जातो की जे करताना आपणच त्या अडकतो. किंबहुना जो डाव दुसऱ्यावर टाकायचा असतो तो आपल्यावरच उलटतो. असाच काहीसा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. ज्यात मासे पकडायला गेलेला पक्षी स्वतःच माशाची शिकार (Fish hunting bird) झाला आहे.

समुद्र किंवा नदीच्या पाण्यावर बरेच पक्षी उडत उडत मासे पकडतात. त्यांचा अंदाजा अगदी अचूक असतो. मासा दिसताच बरोबर आकाशातून पाण्याच्या दिशेनं उडत येत अगदी काही क्षणांतच तो मासा चोचीत धरून पुन्हा दुसऱ्या दिशेनं ते झेप घेतात. अशाचा माशाला पकडण्यासाठी एक पक्षी पाण्यापर्यंत पोहोचला पण माशाला आपलं भक्ष्य बनवण्याऐवजी तोच माशाचं भक्ष्य बनला आहे.

व्हिडीओत पाहू शकतात, एक पक्षी पाण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आपण आपल्या भक्ष्याच्या नाही तर शिकारीच्या जवळ पोहोचलो आहोत, याची किंचितसीही कल्पना त्याला नव्हती. त्यामुळे तसा तो बिनधास्त, बेसावधच आहे. पण पाण्याच्या आतील मासा मात्र त्या पक्ष्यावर बरोबर नजर ठेवून आहे.

हे वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी भयंकर उपाय; त्याने चक्क खाल्ला कच्चा विषारी साप आणि...

इकडे पक्षी पाण्यापर्यंत पोहोचतो आणि तो एखादा मासा आपल्या चोचीत धरणार त्याच आधीच पाण्यात दबा धरून धरलेला मासा त्याच्यावर हल्ला करतो. पाण्याच्या बाहेर उंच झेप घेत तो पक्ष्याला आपल्या तोंडात घेतो. पाण्यात मगर जशी गुपचूप राहून संधी साधून आपल्या शिकाऱ्यावर हल्ला करते, अगदी तसाच हल्ला या माशाने केला आहे. त्याने बरोबर पक्ष्याला मधोमध ठरलं आहे. त्यामुळे पंख असूनही पक्ष्याला काही त्या माशाच्या तावडीतून सुटून उडून जाणंही शक्य होत नाही. मासा त्या पक्ष्याला आपल्या तोंडात धरतो आणि पुन्हा पाण्यात जातो.

हे वाचा - जिराफला पानं खाऊ घालत होता मुलगा, अचानक हवेतच उडाला; पाहा Shocking Video

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे.

First published:

Tags: Fish, Shocking viral video, Viral, Viral videos