Home /News /viral /

VIDEO: अचानक भिंतींतून येऊ लागले ओरडण्याचे आवाज; बचाव पथकाला नग्नावस्थेत आढळली महिला

VIDEO: अचानक भिंतींतून येऊ लागले ओरडण्याचे आवाज; बचाव पथकाला नग्नावस्थेत आढळली महिला

एक महिला दोन इमारतींच्या काँक्रीटच्या भिंतींमध्ये अडकलेली आढळली. तिला वाचण्यालाठी बचाव पथकाने अनेक तास प्रयत्न केले

    नवी दिल्ली 16 जुलै : एक वेगळीच घटना सध्या समोर आली आहे. यात एक महिला दोन इमारतींच्या मध्ये अडकली होती. जेव्हा बचावकर्त्यांनी महिलेची इथून सुटका केली तेव्हा ती नग्न अवस्थेत आढळून आली (Woman Got Stuck Between Two Buildings). अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कॅलिफोर्नियातील (California) एक महिला दोन इमारतींच्या काँक्रीटच्या भिंतींमध्ये अडकलेली आढळली. तिला वाचण्यालाठी बचाव पथकाने अनेक तास प्रयत्न केले. अखेर या महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं (Firefighters Rescue Woman Trapped Between Two Buildings) आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं. ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील आहे. झाडाखाली सेल्फी घेणं भावंडांना भोवलं; अचानक वीज कोसळली अन्.., घटना कॅमेऱ्यात कैद फॉक्स न्यूज डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, सेंटा एनामधील ऑरेंज काउंटी फायर अथॉरिटीनं सांगितलं की दुपारी सुमारे दोन वाजता महिलेचा पत्ता लागला. घटनास्थळापासून जवळच असलेल्या एस अॅण्ड सी ऑटो बॉडी शॉपच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, की त्यांनी महिलेला मदतीसाठी ओरडताना ऐकलं. मात्र, त्यांना ही महिला कुठे आहे, हे समजू शकलं नाही आणि पोलिसांना मदतीसाठी बोलावण्यात आलं. कर्मचाऱ्यांनी सांगितलं, की आम्ही पोलिसांनी बोलावलं असता ते आवाज ऐकताच छतावर चढले. त्यांनी दोन भिंतींच्या मध्ये पाहिलं असता याठिकाणी नग्न अवस्थेत एक महिला होती. ती प्रचंड वेदनेत होती आणि ओरडत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला एक फूटापेक्षाही कमी जागेत अडकली होती. बायकोच्या सौंदर्याचं रहस्य काय? चक्क हातोड्याने नवऱ्याने केला पंचनामा महिलेला याठिकाणाहून बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी अद्याप याबाबत माहिती दिली नाही, की महिला याठिकाणी कशी पोहोचली किंवा ती नग्न अवस्थेत का होती. OCFA चे कॅप्टन थॅन गुयेन म्हणाले की सध्या सर्वांसाठीच हे एक रहस्य आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Video viral

    पुढील बातम्या