• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आत्महत्येसाठी युवकानं घेतली इमारतीवरुन उडी, मात्र देवदूताप्रमाणं धावून आला 'तो' आणि...; Video Viral

आत्महत्येसाठी युवकानं घेतली इमारतीवरुन उडी, मात्र देवदूताप्रमाणं धावून आला 'तो' आणि...; Video Viral

एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी इमारतीवरुन उडी घेतो, मात्र खिडकीच्या जवळ उभा असलेल्या बचाव कर्मचाऱ्यांपैकी एक त्याला पकडण्यात यशस्वी ठरतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Shocking Video Viral) होताच सगळेच अवाक झाले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 13 ऑगस्ट : जगभरात अशा अनेक घटना घडतात. ज्याबद्दल ऐकूनच अनेकांना धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Suicide Video) होत आहे. यात दिसतं, की एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी इमारतीवरुन उडी घेतो, मात्र खिडकीच्या जवळ उभा असलेल्या बचाव कर्मचाऱ्यांपैकी एक त्याला पकडण्यात यशस्वी ठरतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल (Shocking Video Viral) होताच सगळेच अवाक झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अरे हिला आवरा! लग्नादिवशीच दारू ढोसतेय नवरी; VIDEO VIRAL सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या छतावरुन उडी घेतो. इमारतीतील काही बचाव कर्मचारी त्याला पाहत असतात. तो व्यक्ती उडी मारल्यानंतर खिडकीच्या समोर येताच यातील एक कर्मचारी त्याला पकडतो. यानंतर तो आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला आतल्या बाजूला खेचतो. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सर्वांनाच हैराण करणारा आहे. बंदूक नाही, तर चिठ्ठी घेऊन बँकेत चोरी करायला पोहोचला चोर, मजकूर वाचून सगळे थक्क हा व्हिडिओ रेडिटवर पोस्ट केला गेला आहे आणि आतापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. शेकडो लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, मला वाटतंय तो अतिशय वेगात जमिनीवर कोसळला असता. मात्र, बचाव कर्मचाऱ्यानं अत्यंत प्रयत्नांतून त्याला वाचवलं. दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहिलं, की मला हेच समजलं नाही की आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला इमारतीतील व्यक्तीनं हवेतच कसं वाचवलं. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: