Home /News /viral /

किचनमध्ये अचानक लागली आग, महिला विझवायला गेली पण शेवटी...; थरकाप उडवणारा LIVE VIDEO

किचनमध्ये अचानक लागली आग, महिला विझवायला गेली पण शेवटी...; थरकाप उडवणारा LIVE VIDEO

किचनमध्ये स्वयंपाक करताना महिला आपला लाइव्ह व्हिडीओ बनवत होती. त्याचवेळी आगीची ही भयंकर दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली.

    वॉशिंग्टन, 16 मे :  स्वयंपाक करणं वाटतं तितकं सोपं नाही. किचनमध्ये सावधगिरीही बाळगावी लागते. छोटीशी चूक किंवा दुर्लक्षपणा अगदी जीवावरही बेतू शकतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक महिला स्वंयपाक करत असताना किचनमध्ये अचानक आग लागली. व्हिडीओ पाहूनच तुम्हाल धडकी भरेल (Fire in Kitchen). तसे सोशल मीडियावर तुम्ही खाद्यपदार्थ बनवताना किंवा रेसिपीचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तोंडाला पाणी सुटतं. पण एका महिलेने कुकिंग करताना शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगाला घाम फुटेल (Kitchen fire video). महिला किचनमध्ये स्वयंपाक करत असताना अचानक पॅनमध्ये आग लागली. त्यानंतर जे काही घडलं ते पाहून अंगावर काटा येईल. या महिलेचं सोशल मीडियावर बरेच व्हि़डीओ आहेत. ती आपले व्हिडीओ सतत पोस्ट करत होती. यावेळी तिने आपला किचनमध्ये जेवण बनवताना व्हिडीओ शूट केला. ती आपल्या चाहत्यांसोबत लाइव्ह स्ट्रिमिंग करत होती. तिने कॅमेरा ऑन केला आणि कॅमेऱ्यासमोर ती स्वयंपाक करू लागली. पण आपली ही हौस, प्रयत्न याचा शेवट असा असेल याचा तिने विचारही केला नव्हता. हे वाचा - धक्कादायक! 'लपाछपी'चा खेळ चिमुकलीच्या जीवावर; मेंदूतून भळाभळा वाहू लागलं रक्त अखेर... ही महिला पॅनवर काहीतरी बनवताना दिसते आहे. आधीच किचनमध्ये धूर धूर झाल्याचा दिसतो आहे. महिला  पॅनवरील पदार्थ काढून बाजूला ठेवते. त्यानंतर गॅसकडे पाठ करते. धुरामुळे या महिलेला खोकलाही येतो. ती हात हलवत धूर आपल्या तोंडावरून बाजूला करते. इतक्यात पॅनला अचानक आग लागते. ते पाहून ही महिला घाबरते. ती पॅन उचलते आणि बेसिनकडे आणून त्यावर पाणी सोडते. पण आग विझण्याऐवजी अधिक भडकते आणि संपूर्ण किचन धुराने भरून जातं. त्यावेळी काय करावं ते महिलेलाही सूचत नाही. शेवटी ती तो पॅन पुन्हा गॅसवरच ठेवते. तेव्हा त्या गॅसवरही आग पसरते. महिला किचनमधून बाहेर पडते आणि मदतीसाठी हाका मारते. ही दुर्घटना इतकी भयंकर होती ही यात महिलेचा जीवही गेला असता. हे वाचा - OMG! तरुणीने पाण्यात केला इतका जबरदस्त Stunt; पुन्हा पुन्हा पाहाल हा VIDEO @barstoolsports ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही आग का लागली नेमकं माहिती नाही. पण एकंदर ही महिला कदाचित पहिल्यांदाचा स्वयंपाक करत असावी, असंच दिसून येतं आहे. शिवाय तिने पॅनमधील पदार्थ काढल्यानंतर गॅस बंद केल्याचंही दिसत नाही. पॅनमध्ये कदाचित तेल वगैरे काहीतरी असावं आणि तिने तसाच पॅन पाण्याखाली धरला असावा आणि आगीने अधिक पेट घेतला असावा. तुम्हाला यापैकी किंवा याशिवाय आणखी काही कारण या व्हिडीओत दिसत असेल तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fire, Viral, Viral videos

    पुढील बातम्या