बापरे! उंदारामुळे जळालं ऑफिस, चौकशीदरम्यान समोर आले धक्कादायक PHOTOS

बापरे! उंदारामुळे जळालं ऑफिस, चौकशीदरम्यान समोर आले धक्कादायक PHOTOS

8 फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील मारूती नेक्सा कार शोरूममध्ये आग लागली होती.

  • Share this:

हैदराबाद, 21 ऑगस्ट : शेतापासून ते घरापर्यंत केवळ विद्ध्वंस करणार आणि नुकसान करणार प्राणी म्हणजे उंदीर. शेतातलं पिक असो की घर अथवा ऑफिसमधील सामान. उंदीर येऊ नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. हैदराबादमध्ये एका ऑफिसला लागलेल्या आगीचा खुलासा 6 महिन्यांनी खुलासा झाला आहे. ही आग एका उंदरामुळे लागल्याचं CCTV मधून समोर आलं आहे.

हैदराबादमध्ये मुशीदाबाद इथे एका कार सेंटरमध्ये फेब्रुवारी महिन्यात मोठी आग लागली होती. या आगीत साधारण 1 कोटींचं मोठं नुकसान झालं होतं. या आगीचं नेमकं कारण मात्र उलगडलं ते 6 महिन्यांनंतर सीसीटीव्हीमुळे. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये चौकशीदरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे.

हे वाचा-...आणि बघता बघता अख्खा डोंगर खचला, पाहा थरारक LIVE VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार 8 फेब्रुवारी रोजी हैदराबादमधील मारूती नेक्सा कार शोरूममध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत तीन कारसह 1 कोटींचं मोठं नुकसान झालं होतं. पोलिसांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजून या केसची फाइल बंद केली. पण कंपनीतील सीसीटीव्ही व्हिडीओमधून या आगीचं नेमकं कारण समोर आल्यानंतर मात्र सर्वांनाच धक्का बसला.

अहवालानुसार सकाळी 10 वाजता शोरूममध्ये पूजा होते आणि त्यानंतर सहकारी आपल्या कामाला सुरुवात करतात. त्यानंतर दोन तासांनी एक उंदीर दिव्यातली वात तोंडात घेऊन शोरूममधून पळून जात असताना दिसत आहे. त्याच्या या धावपळीत तोंडातली वात खुर्चीखाली पडते आणि आगीचा भडका उडतो. या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानं सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. शॉर्ट सर्किटनं नाही तर उंदरामुळे ही आग लागली होती.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 21, 2020, 1:48 PM IST

ताज्या बातम्या