• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ‘सजना है मुझे सजना के लिए’ गाण्यावर आजीबाईचा अनोखा डान्स; VIDEO जिंकेल तुमचं मन

‘सजना है मुझे सजना के लिए’ गाण्यावर आजीबाईचा अनोखा डान्स; VIDEO जिंकेल तुमचं मन

व्हिडिओमध्ये आजीबाई आपल्या बोटांनी गाण्याच्या बोलावर डान्स करताना दिसते. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : सोशल मीडिया (Social Media) एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर काहीही पोस्ट करताच व्हायरल होतं. अनेकदा लोकांचं टॅलेंट (Talent) जगासमोर येत नाही. मात्र सोशल मीडिया या लोकांना आपलं टॅलेंट जगाला दाखवण्याची संधी देतं. सध्या अशाच एका आजीबाईचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Old Lady) झाला आहे. यात दिसणाऱ्या आजीबाईचं टॅलेंट थक्क करणारं आहे. व्हिडिओमध्ये आजीबाई आपल्या बोटांनी गाण्याच्या बोलावर डान्स करताना दिसते. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ लोक वारंवार पाहत आहेत. व्हिडिओमध्ये आजाबाई प्रसिद्ध गाणं ‘सजना है मुझे सजना के लिए’ वर डान्स (Dance Video) करताना दिसतात. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की या आजीबाई आधी व्यवस्थित तयार होतात. साडी नेसतात, बांगड्या घालतात. यासोबतच व्हिडिओमध्ये मागे गाण्याचा आवाजही येतो. ‘सजना है मुझे सजना के लिए’ या गाण्यावर आजीबाई आपली कलाकारी दाखवतात. साडीसोबत त्यांनी देशी लूक केला आहे. हाताला त्यांनी पिवळा रंग लावला आहे. ‘सजना है मुझे सजना के लिए’ हे गाणं अमिताभ बच्चन, नूतन आणि पद्मा खन्ना यांच्या सौदागर सिनेमातील आहे. हे गाणं आशा भोसले यांनी गायलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Anuj Tutter (@anujtutter00)

  व्हायरल होणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही anujtutter00 नावाच्या पेजवर पाहू शकता. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलंय व्हायरल व्हिडिओ, आजीबाई. या पेजवर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. याआधी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आजीबाईंनी ‘हां जी बिलकुल प्यार करेंगे, सीधा दिल पे वार करेंगे’ गाण्यावर परफॉर्मन्स केला होता. हा व्हिडिओ 1 मिलियनहून अधिकांनी पाहिला होता. सध्या व्हायरल झालेला व्हिडिओदेखील सोशल मीडिया यूजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओवर तुम्हाला हजारो कमेंट पाहायला मिळतील. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं की आजीबाईनं तर कमाल केली. आणखी एकानं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं की इतका सुंदर व्हिडिओ याआधी कदाचितच पाहिला असेल. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: