Home /News /viral /

या PHOTO दडलंय एका मुलीचं नाव; तुम्ही सांगू शकाल का?

या PHOTO दडलंय एका मुलीचं नाव; तुम्ही सांगू शकाल का?

मुलीचं नाव दडलेला हा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल.

    मुंबई, 20 जानेवारी : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात (Social Media Viral). सोबतच काही चॅलेंज, गेम, पझलही (Social Media Puzzle)  व्हायरल होतात. सध्या असंच एक चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरस होत आहेत. एक फोटो चर्चेत आहे, ज्यामध्ये एका मुलीचं नाव दडलं आहे (Find the girl name in photo). हे नाव ओळखण्याचा प्रयत्न बहुतेक नेटिझन्स करत आहेत. फोटोत तुम्ही पाहू शकता एक शंभर रुपयाची नोट दिसते आहे आणि एक नळ दिसतो आहे. शंभर रुपयाची नोट आणि नळ असं एकत्र करून एक शब्द तयार होतो, ज्यातून एका मुलीचं नाव मिळतं. एका ट्विटर युझरने हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत या फोटोतील मुलीचं नाव शोधण्याचं आव्हान दिलं आहे. बहुतेक नेटिझन्स मुलीचं नाव शोधत आहेत. तुम्हीही हा फोटो नीट पाहा आणि तुम्हाला यात तिचं नाव सापडतं आहे का पाहा. तुम्हालाही काही सूचत नाही आहे का. चला आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. शंभर रुपये आणि नळाला हिंदीत काय म्हणतात ते सांगा आणि हे दोन्ही शब्द एकत्र करा. काय मग सापडलं का तुम्हाला उत्तर. हो बरोबर या फोटोत दडलेलं मुलीचं नाव आहे सोनल. आता तुम्हीही हे चॅलेंज तुमच्या मित्रमैत्रिणींना द्या. पाहा तुमच्याप्रमाणे त्यांनाही नाव सापडतं आहे का? हे वाचा - OMG! पळता पळता अचानक हवेतच उडू लागलं हरिण; कधीच पाहिला नसेल असा अद्भुत VIDEO सोशल मीडियावर असे बरेच फोटो व्हायरल होत असतात. आता हा फोटो पाहा, यामध्ये एक बेडुक लपला आहे. फोटो पाहिला तर तुम्हाला यात पाणी, दगड आणि पानं दिसतील पण बेडूक बिलकुल नाही. त्यामुळे पाहताच क्षणी तुम्ही म्हणाल की यात बेडुक नाहीच. पण तसं नाही यात खरंच बेडूक आहे. बेडूक इतका छोटा आहे की तो सहजासहजी या फोटोत दिसत नाही. त्यामुळे त्याला शोधणं कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. फेसबुक युझर ग्लेंडा फिलिप्सने (Glenda Adams Phillips) हा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ग्लेंडाने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटिझन्स या बेडकाला शोधू लागले. आपल्या डोळ्यांची एकप्रकारे टेस्ट घेत आहेत. तरी बहुतेकांना बेडुक दिसलाच नाही आहे. हे वाचा - कुठे Drink and Drive ला परवानगी, कुठे खाण्यालाही मनाई! जगातील अजब Traffic Rule आता तुम्ही तुमच्या डोळ्यांचीही टेस्ट घ्या. पाहा तुमची नजर किती शार्प आहे, तुम्हाला हा बेडूक दिसतो आहे का पाहा. तुम्ही बेडूक शोधला तर उत्तमच आहे. नाही शोधला तर आम्ही तुम्हाला मदत करतो. खालील फोटो पाहा. बेडूक नेमका कुठे लपला आहे, तो तुम्हाला दिसेल. काय मग सापडला का बेडूक. आता पाहत काय बसलात. लगेच ही बातमी तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबातील सदस्यांना, जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि त्यांनाही बेडूक शोधण्याचं, आय टेस्टचं हे चॅलेंज द्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Game, Social media, Viral, Viral photo

    पुढील बातम्या