मुंबई, 20 एप्रिल : आता आंब्यांचा सिझन सुरू आहे. बाहेर मार्केटमध्येच नव्हे तर अगदी टीव्ही, सीरिअल्स आणि सोशल मीडियावरही तुम्हाला आंबे पाहायला मिळतील. आंबा न आवडणारी किंवा न खाणारी व्यक्ती क्वचितच सापडेल. माणूसच नव्हे तर अगदी प्राणीपक्षीही आंब्याचा आस्वाद घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक पोपट आंबे खायला गेला पण आंब्यात तो असा एकरूप झाला की त्याला आता शोधणं मुश्किल झालं आहे
(Parrot hidden in mango photo viral).
सध्या सोशल मीडियावर आंब्यात दडलेला पोपट शोधण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आंब्यांच्या ढिगाऱ्यात पोपट दडला आहे. पण या पोपटाचा रंग अगदी हुबेहुब आंब्यासारखा असल्याने तो या ढिगाऱ्यात दडला आहे. तो सापडतच नाही आहे. आता तुम्हालाही हेच चॅलेंज आहे की या फोटोत दडलेला पोपट तुम्हाला शोधायचा आहे. या इतक्या आंब्यांमधून तुम्हाला पोपटाला बाहेर काढायचं आहे.
भल्याभल्यांना या आंब्यांमध्ये लपलेला पोपट सापडला नाही आहे. किती तरी लोक फेल झाले आहेत. आता तुम्हाला तरी तो पोपट शोधता येतो आहे का ते पाहा. तुमची नजर किती तीक्ष्ण आहे तेसुद्धा यावरून समजेल.
हे वाचा - कोणत्याही रंगाच्या साबणाचा फेस पांढराच का असतो? जाणून घ्या...
आंब्यातील पोपट तुम्हाला दिसला तर उत्तमच आणि तुम्ही तो शोधण्यात अयशस्वी ठरलात तरी निराश होऊ नका. हा पोपट नेमका कुठे लपला आहे हे शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला थोडी मदत करतो.

आंब्याच्या या ढिगाऱ्यात पोपट डाव्या बाजूला बसला आहे. फोटोवर तुमची नजर डाव्या बाजूला वळवा आणि तिथं नीट पाहा. तुम्हाला त्याचं डोकं दिसेल. त्यावर एक चोच आणि डोळाही तुम्हाला दिसेल.
हे वाचा - वेलची ब्रेस्ट कॅन्सर उपचारात प्रभावी! अमेरिकन संशोधनातून शिक्कामोर्तब, वाचा कसे करते काम
दिसला का? नाही. अजूनही पोपट तुम्हाला दिसला नाही तर मग आता खालील फोटो पाहा.

फोटोवर जिथं वर्तुळ केलं आहे, तिथं पोपट आहे. आता तरी दिसला का? हो ना. मग आता बिलकुल वेळ घालवू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना ही बातमी शेअर करा आणि त्यांनाही या हे चॅलेंज द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.