मराठी बातम्या /बातम्या /Viral /

या फोटोत बेडुक शोधण्यात अनेक जण फेल; पाहा तुम्हाला तरी सापडतंय का

या फोटोत बेडुक शोधण्यात अनेक जण फेल; पाहा तुम्हाला तरी सापडतंय का

या फोटोत बेडकाला शोधणं कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही.

या फोटोत बेडकाला शोधणं कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही.

या फोटोत बेडकाला शोधणं कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 19 सप्टेंबर : अनेकदा असं होतं की एखादी वस्तू आपल्या डोळ्यांच्या अगदी समोर असते (Spot in The Picture) पण ती आपल्याला दिसत नाही किंवा आपली त्यावर नजर पडत नाही. काखेत कळसा नि गावाला वळसा अशी म्हण तुम्हाला माहितीच असेल (Mind Boggling Puzzles). अगदी तसंच आपल्यासोबत होतं. असाच एका फोटो (Frog Picture) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (frog hiding between leaves and rocks) ज्यामध्ये एक बेडूक लपला आहे (Find The Frog). फेसबुक युझर ग्लेंडा फिलिप्सने (Glenda Adams Phillips) हा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ग्लेंडा लुसियानातील ग्रीनवेल स्प्रिंग्जमध्ये (Greenwell Springs, Louisiana) राहते. एके रात्री तिला बेडकाने हैराण केलं. बेडकाचा आवाज ऐकून ऐकून ती वैतागली. ती बेडकाला पळवण्यासाठी घराबाहेर आली. तेव्हा उलड बेडकानेच तिच्यावर उडी मारली आणि नंतर दगडांमध्ये जाऊन लपला. त्यावेळी तिने हा फोटो काढला. ग्लेंडाने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत, त्यातून बेडूक शोधण्याचं चॅलेंज (Spot The Frog) दिलं आहे. हे वाचा - दाखवून द्या तुम्हीच आहात हुश्शार! VIDEO मध्ये मधमाश्यांच्या 'राणी'ला शोधा फोटो पाहिला तर तुम्हाला यात पाणी, दगड आणि पानं दिसतील पण बेडूक बिलकुल नाही. त्यामुळे पाहताच क्षणी तुम्ही म्हणाल की यात बेडुक नाहीच. पण तसं नाही यात खरंच बेडूक आहे. बेडूक इतका छोटा आहे की तो सहजासहजी या फोटोत दिसत नाही. त्यामुळे त्याला शोधणं कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. ग्लेंडाने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटिझन्स या बेडकाला शोधत आहेत. आपल्या डोळ्यांची एकप्रकारे टेस्ट घेत आहेत. तरी बहुतेकांना बेडुक दिसलाच नाही आहे. हे वाचा - शोधा म्हणजे सापडेल! खोडात लपलेला भयंकर प्राणी तुम्हाला दिसला का? आता तुम्ही तुमच्या डोळ्यांचीही टेस्ट घ्या. पाहा तुमची नजर किती शार्प आहे, तुम्हाला हा बेडूक दिसतो आहे का पाहा. तुम्ही बेडूक शोधला तर उत्तमच आहे. नाही शोधला तर आम्ही तुम्हाला मदत करतो. खालील फोटो पाहा. बेडूक नेमका कुठे लपला आहे, तो तुम्हाला दिसेल. काय मग सापडला का बेडूक. आता पाहत काय बसलात. लगेच ही बातमी तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबातील सदस्यांना, जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि त्यांनाही बेडूक शोधण्याचं, आय टेस्टचं हे चॅलेंज द्या.
First published:

Tags: Game, Lifestyle, Photo, Viral photo

पुढील बातम्या