मराठी बातम्या /बातम्या /Viral /

optical Illusion : 'या' फोटोमध्ये दडलाय इंग्रजी शब्द; हजारो लोकांना नाही सापडला, एकदा तुम्हीही शोधून पाहा

optical Illusion : 'या' फोटोमध्ये दडलाय इंग्रजी शब्द; हजारो लोकांना नाही सापडला, एकदा तुम्हीही शोधून पाहा

 एक ऑप्टिकल इल्युजन (Viral Optical illusion) सध्या ट्विटरवर फेमस झालं आहे. याला कारण म्हणजे, या चित्रात लपलेला एक शब्द ओळखणं कित्येकांना अशक्य झालंय.

एक ऑप्टिकल इल्युजन (Viral Optical illusion) सध्या ट्विटरवर फेमस झालं आहे. याला कारण म्हणजे, या चित्रात लपलेला एक शब्द ओळखणं कित्येकांना अशक्य झालंय.

एक ऑप्टिकल इल्युजन (Viral Optical illusion) सध्या ट्विटरवर फेमस झालं आहे. याला कारण म्हणजे, या चित्रात लपलेला एक शब्द ओळखणं कित्येकांना अशक्य झालंय.

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : ऑप्टिकल इल्युजन (optical Illusion) असणारी चित्रं तुम्ही इंटरनेटवर बरेचदा पाहिली असतील. प्रथमदर्शनी साधारण दिसणाऱ्या या चित्रांमध्ये नीट पाहिल्यास दुसरीच एखादी गोष्ट दडलेली दिसून येते. यात मग कधी प्राण्यांचे आकार, तर कधी अक्षरं किंवा अंकही दिसून येतात. इंटरनेटवर कोडी घालण्यासाठी म्हणून अशा प्रकारची चित्रं लोक आपल्या मित्रांशी शेअर करतात. यातील काही चित्रं प्रचंड व्हायरल होतात. असंच एक ऑप्टिकल इल्युजन (Viral Optical illusion) सध्या ट्विटरवर फेमस झालं आहे. याला कारण म्हणजे, या चित्रात लपलेला एक शब्द ओळखणं कित्येकांना अशक्य झालंय. एबीपी लाईव्हने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. फोटो पाहून येईल चक्कर हा फोटो पाहिल्यानंतर पहिल्यांदा तर तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटेल. @thefigen नावाच्या ट्विटर हँडलवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. 29 जुलै रोजी पोस्ट झालेल्या या फोटोला आतापर्यंत हजारो लोकांनी शेअर केले आहे. या फोटोमध्ये पांढऱ्या बॅकग्राउंडवर कित्येक काळ्या रेषा (Viral optical illusion) आहेत. या रेषा एका विशिष्ट पॅटर्नमध्ये आहेत. फोटो पोस्ट करणाऱ्याचा असा दावा आहे, की नीट पाहिल्यास यात इंग्रजीचा एक शब्दही (Optical illusion with hidden word) दिसून येतो. ज्या व्यक्तींचे डोळे चांगले आहेत, त्यांना हा शब्द पटकन दिसेल असंही हा फोटो शेअर करणारे म्हणत आहेत. तुम्हीदेखील हा फोटो पाहा, आणि त्यातील शब्द ओळखण्याचा एकदा प्रयत्न करा. यासाठी आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. हा शब्द (Hidden word in Optical Illusion) चार अक्षरी आहे. हेही वाचा -  OMG! तरुणाने स्वतःच्या शरीरावर सपासप फिरवली तलवार; अंगावर काटा आणणारा VIDEO आम्ही सांगतो उत्तर तुम्हाला अजूनही हा शब्द कोणता आहे ते समजलं नसेल, तर टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला या फोटोमध्ये दडलेला शब्द सांगणार आहोत. या फोटोमध्ये खरंतर DUDE हा इंग्रजी शब्द (DUDE optical illusion) लिहिला आहे. एकदा माहिती झाल्यानंतर पुन्हा एकदा जर तुम्ही हा फोटो पाहिलात, तर आता तुम्हाला पटकन हा शब्द दिसून येईल. आता तुम्हाला काय शोधायचं आहे हे माहिती असल्यामुळे तुमचा मेंदू फोटोतील रेषांकडे त्या दृष्टीने पाहतो, म्हणून हे शक्य होतं. कोणतीही हिंट न घेता, पहिल्यांदाच हा फोटो पाहून त्यातील शब्द ओळखणाऱ्या व्यक्तींनी त्यांची नजर अतिशय तीक्ष्ण आहे असं मानण्यास हरकत नाही. इंटरनेटवरील हजारो लोकांप्रमाणे तुम्हीदेखील आपल्या मित्रांसोबत हा फोटो शेअर करून, त्यांना हा शब्द ओळखता येतो का ते पाहू शकता.
First published:

Tags: Photo viral, Social media, Viral news

पुढील बातम्या