मराठी बातम्या /बातम्या /Viral /Optical Illusion : या बर्फात गारठलं मांजर; फक्त 10 सेकंदांत त्याला शोधून काढा

Optical Illusion : या बर्फात गारठलं मांजर; फक्त 10 सेकंदांत त्याला शोधून काढा

या बर्फात मांजर कुठे आहे?

या बर्फात मांजर कुठे आहे?

बर्फामध्ये लपलेलं मांजर 10 सेकंदांत शोधणं नक्कीच सोपं नाही; पण हे तुमच्या बुद्धिमत्तेला आव्हान असेल.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Delhi, India

  मुंबई, 29 जानेवारी : ऑप्टिकल इल्युजनशी निगडित आव्हान हे डोळे आणि बुद्धिमत्तेच्या चाचणीसाठी असतं, असा दावा केला जातो. चित्रात किंवा छायाचित्रात लपलेल्या गोष्टीचा किती हुशारीने शोध घेऊ शकता आणि समोरची गोष्ट कशी पाहू शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे; पण चित्रांत दडलेली आव्हानं अनेक दृष्टिकोनातून खूप मनोरंजक असतात. तुम्ही जेव्हा अशी दडलेली गोष्ट शोधायला बसता तेव्हा वेळ कसा निघून जातो हे तुम्हालाही कळत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनशी निगडित आव्हानं भरपूर शेअर होताना दिसतात. मनात मोठा गोंधळ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची आव्हानं जाणीवपूर्वक दिली जातात. असाच एक फोटो व्हायरल होतो आहे.

  `ब्राइट साइड`ने असंच एक कोडं सादर केलं आहे. यात हिमाच्छादित भागात मांजर शोधण्याचं आव्हान नेटकऱ्यांना देण्यात आलं आहे. आजूबाजूला पसरलेल्या बर्फामध्ये लपलेलं मांजर 10 सेकंदांत शोधणं नक्कीच सोपं नाही; पण हे तुमच्या बुद्धिमत्तेला आव्हान असेल. लक्षात ठेवा, फोटोत समोर असूनही तुम्हाला धूर्त मांजर सहजपणे दिसणार नाही.

  हे वाचा - Optical Illusion : फोटोमध्ये लपलेले 3 पक्षी शोधून दाखवाच; 15 सेकंदात चॅलेंज पूर्ण करणारा ठरेल बुद्धिमान

  ऑप्टिकल इल्युजन असलेल्या फोटोशी संबंधित आव्हानं सोपी नसतात. हे माहिती असूनही अनेकांना यासाठी डोकेफोड करायला आवडतं. तुम्ही अशांपैकी एक असाल तर फोटोत अगदी समोर जाड बर्फाच्या मध्यभागी असलेलं मांजर शोधून दाखवाच. तुमची नजर अजूनही मांजराला शोधू शकलेली नसेल आणि तुम्ही स्वतःला हुशार, स्मार्ट आणि बुद्धिमान मानत असाल तर 10 सेकंदांत ते धूर्त मांजर शोधून दाखवा. बहुतेक जण मांजर शोधण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हे मजेशीर आव्हान तुम्ही पुन्हा एकदा स्वीकारलं पाहिजे.

  तुम्ही मांजर शोधण्याचा प्रयत्न करत असाल आणि आतापर्यंत अयशस्वी झाला असलात, तर तुम्ही तुमच्या मेंदूला आणखी ताण द्या. आता फोटोच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. ज्या मांजराला शोधताना तुमचं मन गोंधळून गेलं आहे, ते मांजर तुमच्या अगदी समोर असून पाठ दाखवून पळण्याच्या विचारात आहे.

  हे वाचा - ऐकावं ते नवल! चक्क समोशाने केली इंजिनीअरिंग; B.Tech डिग्रीवाला समोसा चर्चेत

  मांजर बर्फासारखं पांढरंशुभ्र असल्याने तुमची नजर सहजपणे चुकवत आहे. त्यामुळे ते समोर असूनही तुम्हाला दिसत नाही. कारण ते बर्फात बसलं आहे. तुम्हाला अजूनही मांजर शोधण्यात अडचण येत असेल तर तुम्ही सोबतचा फोटो पाहू शकता.

  काय दिसलं न मांजर. आता तुम्ही तुमच्या ओळखीतील व्यक्तींना ही बातमी शेअर करून त्यांनाही बर्फातील मांजर शोधण्याचं चॅलेंज द्या. पाहुयात त्यांना जमतंय का ते.

  First published:

  Tags: Cat, Pet animal, Photo, Social media, Viral, Viral photo